नवीन लेखन...

ब्रिटीश लेखिका व्हर्जिनिया वूल्फ

ब्रिटीश लेखिका व्हर्जिनिया वूल्फ यांचा जन्म २५ जानेवारी १८८२ रोजी झाला.

अतिशय बुद्धिमान, तितक्याच संवेदनशील आणि शब्दांवर जबरदस्त पकड असणाऱ्या व्हर्जिनिया वूल्फ यांचा जन्म ब्रिटनमधल्या एका सधन कुटुंबात झाला. आयुष्यभर लेखन, वाचन हा एकच ध्यास घेऊन जन्मलेल्या व्हर्जिनिया यांनी केवळ वयाच्या नवव्या वर्षी व्हर्जिनिया यांनी आपल्या भावाच्या मदतीनं ‘२२ हाइडपार्क गेट’ नावाचं कौटुंबिक साप्ताहिक काढलं होते.

शब्दांवर प्रचंड हुकूमत, सातत्य, संवेदशील लिखाण आणि लेखनात प्रयोगशीलता हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट होते. ‘मिसेस डलोवे’,‘टू द लाइटहाऊस’,‘द वेव्हज’या सारख्या कांदबऱ्या आणि ‘अ रूम ऑफ वन्स ओन’ आणि ‘थ्री गिनीज’ हे त्यांचे निबंध खूपच गाजले. त्यांचे वडिल सर लेस्ली स्टीफन यांचा मुलींना औपचारिक शिक्षण देण्यास विरोध होता. त्यामुळे त्यांचं शिक्षण हे घरच्या ग्रंथालयावरच अवलंबून झालं, पण त्यांचे भाऊ मात्र केम्ब्रिजमध्ये शिकायला गेले, आणि तेव्हापासून स्त्रियांच्या शैक्षणिक हक्काबद्दल त्यांनी आग्रह धरला. सतत वाचन लेखन करून आपली वैचारिक पातळी उंचावली. वयाच्या १९ व्या वर्षी टाइम्स लिटररी सप्लिमेंटमध्ये ग्रंथसमीक्षणे लिहिण्यास त्यांनी सुरुवात केली.

‘वाचकांचा भरपूर आदर करणारं लेखन आपण लेखकांनी केलं पाहिजे कारण हे वाचकच आपल्या लेखनाचं पोषण, संवर्धन करतात,’ अशी त्यांची धारणा होती. म्हणूनच दर्जेदार आणि संवेदनशील लेखन करणाऱ्या मोजक्या साहित्यिकांमध्ये त्यांचं नाव अग्रगण्य होतं, या लेखिकेचा अंत तितक्याच करुणपणे झाला. त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर नैराश्याचा मानसिक आजार व्हिर्जिनिया यांना जडला होता. दुसऱ्या महायुद्धाचं रणशिंग फुंकल्यावर त्यांची मानसिक स्थिती आणखीच खालावली. त्याचे पती लिओनार्ड वुल्फ ज्यू होते, त्यामुळे आपलाही लाखों ज्यूंसारखा छळ होऊन मृत्यू होईल याची कल्पना त्यांना असह्य होऊ लागली. २८ मार्च १९४१ साली त्या घरातून निघाल्या. आपल्या कोटाच्या खिशात भरपूर दगड भरून त्या घराशेजारी असणाऱ्या तलावाच्या दिशेने गेल्या त्यानंतर त्या कधीच परतल्या नाही. १८ एप्रिलला त्यांचा मृतदेह सापडला.

२०१८ मध्ये गुगलने डूडल करून साहित्यविश्वात मानाचा ठसा उमटवणाऱ्या या ब्रिटीश लेखिकेला आदरांजली वाहिली होती.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..