जगभरातल्या मुस्लीम महिला अनेक प्रकारचे हेडस्कार्फ बांधतात, मग तो हिजाब असो, नकाब किंवा बुरखा. यातला फरक सामान्यतः लक्षात येत नाही, म्हणजे कुठला पूर्ण चेहरा झाकतो, कुठला फक्त डोक्यावरून घेतला जातो, आणि कशात डोळ्यांवर जाळी असते. इस्लामी शरियतनुसार प्रत्येक मुस्लिम राष्ट्रांत पडद्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पडदा, बुरखा, हिजाब, रिदा अशा विविध नावांनी ओळखला जात असला तरी पडदा हा पडदाच असतो आणि रक्ताचे नाते नसलेल्या पुरुषांपासून स्वतःला झाकून ठेवण्यासाठी महिला तो वापरतात.
तसं तर ‘हिजाब’चा शब्दशः अर्थ हा कुठलीही गोष्ट झाकणे किंवा त्यावर पांघरूण घालणे, असा आहे. पण आता हिजाब म्हटलं की लगेच मुस्लीम स्त्रिया डोक्यावरून घेतात तो स्कार्फ डोळ्यांसमोर येतो.
हिजाब वेगवेगळ्या रंगात आणि अनेक स्टाईल्समध्ये येतो. पाश्चात्त्य देशांमध्ये जे हिजाब सर्वाधिक दिसतात ते डोकं आणि गळा पूर्णपणे झाकतात, पण चेहरा स्पष्टपणे दिसतो.
नकाब चेहऱ्यासाठीचा एक पदर असतो, ज्यात डोळ्यांभोवतीचा भाग उघडा असतो. तो स्वतंत्रपणे फक्त चेहरा झाकण्यासाठी वापरतो येऊ शकतो, किंवा त्याला हिजाबच्या सोबतीनेही घालता येतं.
मुस्लीम महिला सर्वांत जास्त पर्दानशीन असतात त्या बुरख्यात. डोक्यापासून पायांपर्यंत, असं अख्खं शरीर झाकलेलं असतं आणि फक्त डोळ्यांसमोर येणाऱ्या भागावर एक जाळी असते.
वास्तवात एकीकडे जगभर बुरखा घालणाऱ्या महिलांची संख्या कमी होत आहे. महिलांच्या अधिकारासाठी लढणाऱ्या काही महिला कार्यकर्त्यांचा बुरख्याबाबत दृष्टिकोन काहीसा वेगळा आहे. ज्या देशात बुरखा वापरणे सक्तीचे आहे अशा इराणमध्ये एक पत्रकार माशूकअली निजाद यांनी फेसबुकवर ‘माझे गुप्त स्वातंत्र्य’ या नावाने एक मोहीम सुरू केली होती. ज्यात काही इराणी महिला आपला पडदा काढताना दाखवले होते.
Leave a Reply