सांगा किती किती सावरावे
किती समजवावे या मनाला
प्रवाहा विरुद्ध, पोहणारा मी
कां? विसरू भोगल्या क्षणाला
सद्गुणी सहवासातची जगलो
जगी अर्थ जगण्याचा उमजला
सोबतीला, थवे जरी निंदकांचे
दुर्लक्षूनी, मी सावरले स्वतःला
विवेके, संयमे या जगी जगावे
सांभाळीत साऱ्या मनामनाला
दिशाहीन वाऱ्याचेच ते वाहणे
पंचमहाभूतांची सोबत सृष्टीला
सोहळे, ऋतुचक्रांचेच त्रिलोकी
दृष्टांत! ईश्वरी दाविती मानवाला
— वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. ३५.
४ – २ – २०२२.
Leave a Reply