नवीन लेखन...

अभिनेते व नेपथ्यकार राजन भिसे

राजन भिसे यांचा जन्म २८ फेब्रुवारीला झाला.

राजन भिसे एक हसतमुख अभिनेता म्हणून ओळख टीव्ही व रंगभूमी वर आहे. त्याच्या अभिनयात नेहमी वेगळेपण पाहायला मिळते. स्वत: राजन भिसे आकिर्टेक्ट असल्यामुळे गेली कित्येक वर्षे ते रंगभूमीवर उत्तम नेपथ्यकार म्हणून ही भूमिका पार पाडत असतात. राजन भिसे यांनी पहिल्यांदा रंगमंचावर पाऊल टाकलं ते चौथीत असताना. त्यांचे शालेय शिक्षण वांद्रे इथल्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये झाले. शाळेत असताना आंतरशालेय हिंदी नाटकांची स्पर्धेत त्यांनी हिंदी नाटकातही काम केले घेतलं. त्यात त्यांच्या नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटकाचं बक्षीसही मिळालं होतं. शाळेत असेपर्यंत त्यांनी नाटकात कामे केली. पण, शाळेनंतर आर्किटेक्चरच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यानंतर त्यांचे नाटक सुटलं. आर्किटेक्ट होऊन नोकरीसाठी राजन भिसे बहारिनला गेले. तेथील मराठी ग्रुपनं गणेशोत्सवात बहारिनमध्ये पहिल्या गणपतीची प्रतिष्ठापना केली. तेव्हा तिकडे पहिल्यांदाच राजन भिसे यांनी ‘काका किश्याचा’ हे नाटक बसवलं होतं. त्यावेळी स्थानिकांकडून आणि भारतीय राजदूतांकडून राजन भिसे यांचे त्या नाटकासाठी कौतुक झालं.

राजन भिसे नोकरी सोडून १९८७ साली भारतात परतले. भारतात आल्यानंतर पुन्हा एकदा ते नाटकाशी जोडला गेलो. भारतात परतल्यावर आर्किटेक्चर कॉलेज मधील त्यांचा मित्र प्रदीप सुळे यानं त्यांना ‘आंतरनाट्य’ संस्थेत काम करशील का? असं विचारलं. ‘गॅलिलीओ’ हे नाटक त्या संस्थेकडून बसवण्यात येत होतं. ‘आंतरनाट्य’मध्ये अरुण नाईक, राजीव नाईक, अजित भुरे, विजय केंकरे, रेणुका शहाणे, अतुल परचुरे, संजय मोने, तुषार दळवी, श्रीरंग देशमुख अशी मंडळी होती. दामू केंकरे या ‘आंतरनाट्य’ संस्थेचे अध्यक्ष होते. राजीव आणि अरुण नाईक या बंधूंच्या सहवासात राहिल्यामुळे नाटकाशी राजन भिसे यांची जवळून ओळख झाली. ‘गॅलिलीओ’ या नाटकात त्यांनी पोपची भूमिका साकारली होती. राजन भिसे आर्किटेक्ट असल्यामुळे ‘तसे आम्ही सज्जन’ या नाटकासाठी विजय केंकरे यांनी त्यांना नाटकाचं नेपथ्य करायला सांगतले. ‘गोवा हिंदू असोसिएशन’नं त्या नाटकाची निर्मिती केली होती. राजन भिसे यांचे नेपथ्यकार म्हणून हे पहिले नाटक होते. या नाटकासाठी त्यांना नाट्यदर्पण पुरस्कारासाठी नामांकन मिळलं होतं. ‘आंतरनाट्य’ संस्थेत काम करत असताना दामू केंकरे यांच्या ‘सूर्याची पिल्ले’ या नाटकात राजन भिसे यांनी काम केले. सुरुवातीला जेव्हा दामू केंकरे यांनी हे नाटक बसवलं होते, तेव्हा त्या नाटकात दिलीप प्रभावळकर, माधव वाटवे, बाळ कर्वे, मोहन गोखले, सदाशिव अमरापूरकर अशा कलाकारांची तगडी फळी होती. ‘सूर्याची पिल्ले’ हे त्यांचे पहिलं व्यावसायिक नाटक.

आर्किटेक्ट म्हणून मुंबईत काम करत असताना ते नाटकांसाठी नेपथ्य डिझाईन करायचो. मधल्या काळात अभिनयपासून ते काहीसा लांब होते. एकदा लेखक-दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘तू तू मी मी’ नाटकाचा सेट त्यांनी केला होता. तेव्हा केदार शिंदे विचारले की की तुम्ही की, टीव्ही मालिकेत अभिनय कराल का? अभिनय करण्याची खूप इच्छा असल्यामुळे त्यांनी लगेचच केदारला होकार दिला. ती त्यांची पहिली मालिका होती व मालिका होती ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’. ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या मालिकेतील त्यांची शेखर टिपरे यांची भूमिका सर्वाधिक लोकप्रिय ठरली होती. या सोबतच या सुखांनो या, मला सासू हवी या पण त्यांच्या मालिका गाजल्या होत्या.

पुढे त्यांनी दिग्दर्शक मंगेश कदम यांचे नाटक ‘अधांतर’. जयंत पवार यांचे ‘माझं घर’, प्रशांत दळवी यांचं ‘सेलिब्रेशन’ हे नाटक ‘लग्नाची बेडी’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘ढोलताशे’ अशी अनेक नाटके त्यांनी केली आहेत. अभिनय व नेपथ्य या बरोबरच सध्या अखिल भारतीय नाट्य परिषदेचे काम राजन भिसे बघत आहेत.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..