ही मुग्ध रात्र मिलनाची
नवं यौवना नवथर तू अशी,
चंद्र दुधाळ तो आकाशी
रात्र ही चांदण न्हाली
तू ये प्रिये अशी जवळ जरा
पदर उडे वाऱ्यावर सावर जरा,
गौर लव्हाळ सोन तुझी कांती
ओठ तुझे नाजूक गुलाब पाकळी
स्पर्श होतो मधाळ तुझा
मी धुंद होतो तुझ्यात जरा,
घेता समीप मी तुजला
प्रिये लाजते तू हलकेच तेव्हा
ये मिठीत अलवार तू अशी
ओठ ओठांना भिडतील त्या वेळी
मधुरस तो अलगद चुंबीता
सर्वांगी फुलेलं गंधित काया
घेतो मिठीत अलगद तुजला
चंद्र ही हासेल हळूच तेव्हा,
चांदण टिपूर आकाशी तेव्हा
तारका तुझा मग करती हेवा
प्रहर रात्रीचा उलटेल असा
तू जवळ अशी येशील जरा,
गंधाळेल रसिली रात्रीत तू तेव्हा
गोड मिठी ही तुझी नशिली अदा
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply