आताच दिस आला
लगा मिटला मिटला
कसं राहू कसं सहु
जीव विटला विटला
किती राबू घाम काढू
सोलवटू या अंगाला
परी दिसना कुठंचं
एक सबूद ही ओला
पेरू काय अन कुठं
ओलं नाही ढेकळाला
सारं कातळ कातळ
पाझर नाही रं मुळाला
वणव्यात लाही लाही
नाही जाळं शरीराला
करपून काळीज ह्ये
गेलं मातीला मातीला
असे सरतील दिस
ओलं डोळं रातच्याला
मुकं मुकं सारं जिणं
सरलं सारं उद्याच्याला!!
— वर्षा कदम.
Leave a Reply