भारतातील हावडा ब्रिज
कलकत्ता येथील हुबळी नदीवर बांधलेला रविंद्र सेतू किंवा हावडा ब्रिज हे कॅन्टिलीव्हर पुलाचे एक उदाहरण आहे. या पुलावर १९४३ च्या फेब्रुवारी महिन्यात वाहतूक सुरू झाली. हा जगातील चौथ्या क्रमांकाचा लोंबता कॅन्टेलिवर पूल आहे. याला तीन मुख्य स्पॅन असून त्यापैकी सर्वात मोठा स्पॅन साधारणपणे १५०० फूट आहे. ह्या पुलावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला असे दोन पादचारी मार्ग आहेत. हा पूल बांधण्याकरता २७ हजार टन एवढे स्टील (पोलाद) लागले.
— मराठीसृष्टी व्यवस्थापन
Leave a Reply