तेलगू देशम हा तेलंगणातील व भारतातील प्रबळ प्रादेशिक पक्ष आहे.
२९ मार्च १९८२ रोजी तेलगू सुपरस्टार एन. टी. रामाराव यांनी तेलगू देसम पक्षाची स्थापना केली. तेलगू देसम या पक्षाची स्थापनाच मुळी काँग्रेस विरोधातून झाली होती. काँग्रेसने तेलगू जनतेचा अपमान केला जात असल्याने एन. टी. रामाराव यांनी तेलगू देसम पक्षाची स्थापना करून आंध्र प्रदेशातून काँग्रेसचे उच्चाटन केले होते. तेलगू ते प्रादेशिक अभिमान आणि शेतकरी, मागासवर्गीय आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी एक पक्ष यावर जोर देऊन काँग्रेसच्या पुढाकारासाठी पर्याय म्हणून ही स्थापना झाली.
तेलगू देसम पार्टी ध्वज फॉरग्राउंडमध्ये झोपडी, चाक आणि नांगर चिन्हांसह पार्श्वभूमी रंग म्हणून पिवळा वापरते. अधिकृत सायकल चिन्ह म्हणून एक सायकल वापरली जाते. १९८०च्या दशकात तेलुगू अस्मितेच्या (तेलगू बिड्डा) मुद्द्यावर एन. टी. रामाराव यांच्या तेलुगू देसमला आंध्रची सत्ता मिळाली होती. महिलांना आरक्षण आणि संपत्ती मध्ये समान अधिकार मिळवून देणारे तेलगू देसम हा पहिला पक्ष होता.
१९९४ सालात एन. टी. रामाराव यांच्या नेतृत्वाखाली तेलगू देसम पक्षाने पुन्हा बहूमत मिळवले. किंबहूना सामान्य मतदाराला उघड आमिष दाखवून मते मिळाणारी ती पहिली निवडणूक असावी. एक रुपया किलो तांदूळ देण्याच्या आश्वासनाने रामाराव यांना प्रचंड बहूमत मिळालेले होते.
एन. टी. रामाराव यांचे जावई चंद्राबाबू नायडू हे सध्या या पक्षाचे उच्च नेते आहेत.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply