सॅम वॉल्टन यांचा जन्म २९ मार्च १९१८ रोजी झाला.
खरंतर सॅम वॉल्टनने रिटेल उद्योगाचा शोध लावला नाही. पण वॉल्टनने लोकांच्या खरेदीची मानसिकता अभ्यासली आणि त्याचा योग्य प्रकारे आपल्या व्यवसायासाठी उपयोग केला आणि म्हणूनच त्यांनी अल्पावधीतच रिटेल जगताची गणितच बदलून टाकली. सॅम वॉल्टन यांनी जगाला एक नवी ‘दुकानदारी’ शिकवली, ‘वॉलमार्ट’ नावाची!…
१९८० च्या सुमारास ‘वॉलमार्ट’चे २७६ मॉल्स अमेरिकेत उभे राहिले. पुढे तर त्यांनी वर्षाला १०० मॉल्स हे उद्दिष्ट ठेवेल आणि गाठलेही होते. आजच्या तारखेला वॉलमार्टचे जगभरात अकरा हजार तीनशे हून अधिक मॉल्स आहेत. १९८५ साली जगप्रसिद्ध नियतकालीक फोर्ब्जने जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणुन ‘सॅम वॉल्टन’ यांना घोषित केले होते.सॅम वॉल्टन यांनी ‘मेड इन अमेरीका’ नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. सॅम वॉल्टन यांचं निधन झालं त्यावेळी वॉल्टन यांचा निव्वळ नफा हा २५ बिलियन डॉलर होता.
सॅम वॉल्टन यांचे ५ एप्रिल १९९२ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply