शब्दभावनां,मौनात आता
सत्यही, अंतरीचे कोंडलेले
वैखरीही, जाहली निःशब्द
सुरही, संवादांचे बावरलेले
बेचैनी घुसमट जीवाजीवांची
नेत्री अश्रु,उदास ओघळलेले.
कुणी कुणाला कसे सावरावे
उराशी, हातही घट्ट बांधलेले
उध्वस्त मने, बंधने वास्तवाची
सर्वत्र भितीपोटी राक्षस जागले
आज अस्वस्थ, बेजार स्पंदने
क्षण! भेटीचेही धास्तावलेले
ऋतूऋतुही, जाहले बेभरोसी
आकांत, इथे साऱ्या जीवांचा
वास्तव, जगती सारे अस्वस्थ
चिंतेत सारेच जग अडकलेले
सारीपाट हा या कालियुगाचा
खेळ बेभरोसी जीवनाचा चाले
जाणतो सारे, एक अनामिक
सत्यस्वप्न! जीवनाचे भंगलेले
— वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ९७.
३० – ३ – २०२२.
Leave a Reply