गीतकार नितीन आखवे यांचा जन्म ७ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला.
नितीन आखवे हे आयडीबीआय बँकेत नोकरी करीत होते. आखवे यांनी आयडीबीआय बँकेत नोकरी करताना आपल्या काव्यलेखनाचा छंद कायम जोपासला. संगीतकार श्रीधर फडके यांच्याशी त्यांचे विशेष सूर जुळले होते. या जोडीची ‘फुलले रे क्षण माझे फुलले’, ‘मी राधिका, मी प्रेमिका’, ‘कधी रिमझिम झरणारा आला ऋतू आला’ इत्यादी गाणी खूप लोकप्रिय झाली. श्रीधर फडके यांच्या ‘लिलाव’ या नव्या ध्वनिफितीमधील ‘इतिहास कालचा अभिमान सांगतो’ या गाण्यानेही रसिकांची दाद मिळवली होती. ‘फुलले रे क्षण’ हा कविता संग्रहही प्रकाशित झाला आहे. ‘क्षण’ या चित्रपटातली गाणी नितीन आखवे यांनी लिहिली होती.
नितीन आखवे यांचे ८ एप्रिल २०१२ रोजी निधन झाले.
https://www.youtube.com/watch?v=AqH-TkK9NSk
https://www.youtube.com/watch?v=6WW5iF2MLeY
https://www.youtube.com/watch?v=nHA-wDYIbt4
https://www.youtube.com/watch?v=UyK2GMvyNok
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply