स्वाती दैठणकर यांचा जन्म ९ एप्रिल १९६५ रोजी झाला.
स्वाती दैठणकर या प्रसिद्ध नृत्यांगना आहेत. भरतनाट्यम नृत्यकलेचा असलेल्या दैठणकर यांची ख्याती जागतिक पातळीवर पोहचलेली आहे.
स्वाती दैठणकर या मुंबईच्या, त्या नालंदा नृत्यकला महाविद्यालयाची गोल्ड मेडलिस्ट असून, त्यांनी इंग्रजी साहित्यात सुद्धा पदवी धारण केली आहे. त्या त्यांच्या कार्यक्रमाचे निवेदन स्वतः करतात.अहिल्या, सीता, तारा, मंदोदरी, द्रौपदी ह्या प्रातःस्मरणीय पंचकन्या त्यांच्यावर ‘संवादात्मक नृत्य’ असा अभिनव प्रकार त्यांनी समोर आणला.
‘पंचकन्या’ हा त्यांचा एक प्रयोग, ज्यामध्ये त्या स्वतःच्या कविता, सद्यस्थितीतील सामाजिक प्रश्न व नृत्य एकत्र गुंफून रंगमंचावर एकल सादरीकरण करतात. भरतनाट्यम शैलीशी कुठेही तडजोड न त्या पंचकन्या हा सादर करतात. तसेच कमलपुष्पाचे वाङ्मयीन सौंदर्य आणि वेगवेगळ्या छायाचित्रांचे संकलन करून डॉ. प्रकाश जोगळेकर यांनी ‘पद्मिनी’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकावर आधारित ‘पद्मिनी’ हा विशेष वा कार्यक्रम भरतनाट्यम नृत्यांगना डॉ. स्वाती दैठणकर या सादर करतात. दैठणकर आणि सहकारी नृत्यांगना कमलपुष्पांची विविध रूपे यातील नृत्यातून उलगडतात. याला संगीत धनंजय दैठणकर यांनीच दिले आहे. नृत्य शिक्षणासाठी आणि नृत्य प्रसारासाठी साठी वेगवेगळ्या देशांत त्यांनी नृत्य मैफली सादर केल्या आहेत.
डॉ.स्वाती दैठणकर व डॉ.धनंजय दैठणकर हे ‘नूपुरनाद’ या नावाने वेगळ्या प्रकारच्या सहसादरीकरण करत असतात. स्वाती दैठणकर यांची “नुपूर अकादमी” या च्या नावे त्यांची अकादमी आहे. “नुपूर अकादमी” मध्ये भरतनाट्यम सोबत शास्त्रीय तसेच सुगम संगीत शिक्षणासोबत तबला, संतूर वादनाचे प्रशिक्षण ही देण्यात येत आहे.
स्वाती दैठणकर यांच्या घरात सगळेच कलाकार आहेत.त्यांचे पती डॉ.धनंजय दैठणकर हे आर्युवेदीक डॉक्टर असून उत्कृष्ट संतूर वादक म्हणूनही ओळखले जातात, व चिरंजीव निनाद दैठणकर हे संतूर वादक आहे, व कन्या नुपूर ही नृत्यंगना व अभिनेत्री आहे. तसेच नुपूर आपली आई सोबत “नुपूर अकादमीत” नृत्याचे प्रशिक्षण देत असते.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply