अभिनेता अभिजित चव्हाण यांचा जन्म १० एप्रिल १९८१ रोजी झाला.
अभिजीत चव्हाण यांना ओळख मिळवून दिली त्या ई मराठी व कलर्स मराठी वरील कॉमेडीची बुलेट ट्रेन ह्या विनोदी कार्यक्रमाने आणि त्यात ही भूषण कडू सोबत रंगवल्या जाणाऱ्या “मोरु आणि मास्तर” ह्यातील मास्तरच्या भूमिकेने ते प्रत्येक मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचले आणि साहजिकच त्यांच्यावर विनोदी कलाकार असा शिक्का ही बसला .
अभिजीत चव्हाण यांनी रंपाट,गोजिरी,सायकल आणि बऱ्याच मराठी सिनेमात लक्षवेधी भूमिका केल्या आहेत. अगली, रॉकी हँडसम आदी हिंदी सिनेमात सुद्धा त्यांनी उत्तम काम केले आहे. तसेच पु.ल. देशपांडे ह्यांच्यावर आलेल्या “भाई” ह्या बायोपिक मध्ये आचार्य अत्रे ह्यांची भूमिका अभिजीत सरांनी केली आहे. स्वतः कॉमेडी स्कीट्स करणारे अभिजित यांनी कॉमेडी शोजमध्ये परीक्षक म्हणूनही काम केले आहे.
एक थी बेगम या वेबसिरीज मध्ये यशवंत तावडे ह्या भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याची भूमिका अभिजित चव्हाण यांनी केली आहे. पण यशवंत तावडे यांच्या त्यांना आपण भुमिकेत पाहतो तेंव्हा त्यांच्या अभिनयाची उंची लक्षात येते.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply