नवीन लेखन...

भारतीय रेल्वेचा वाढदिवस

आज १६ एप्रिल १८५३ रोजी या दिवशी बोरीबंदर ते ठाणे देशातली पहिली रेल्वे धावली. भारतात जगन्नाथ सेठ आणि जमशेदजी जीजीभाई यांनी पहिल्यांदा रेल्वे रुळ आणले. त्यांनीच जीआयपी अर्थात ग्रेट इंडीयन पेनिन्सुला रेल्वेच्या संचालकपदावर राहून भारतात पहिली रेल्वे आणली. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भारतात मुंबई ते ठाणे या मार्गावर देशात पहिली रेल्वे धावली. त्या दिवशी बोरीबंदर ते ठाणे असा ३५ किमीचा प्रवास ४५ मिनीटांत पहिल्या रेल्वेने पार पाडला होता. या रेल्वेला १४ डब्बे होते. या रेल्वेत जवळपास ४०० लोकांनी प्रवासाचा अनुभव घेतला होता.

लोकल हा शब्द ट्रेनच्या इतिहासात पहिल्यांदा १ फेब्रुवारी १८६५ रोजी निघालेल्या वेळापत्रकात वापरण्यात आला. कल्याण ते उत्तर आणि माहिम ते पश्चिम या विभागांसाठी हा शब्द वापरण्यात आला होता. काळानुरुप या लोकलमध्ये खूप बदल होत गेले. ६ डब्यांपासून १५ डब्यांपर्यंत लांबलचक झाली ही गाडी. पादचारी पूल तयार झाले. पश्चिम रेल्वेवरच जगातली पहिली लेडीज स्पेशल ट्रेन धावली, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ रवींदर भाकर यांनी दिली. त्यानंतर भारतात दरवर्षी या रेल्वेच्या डागडुजीसाठी अर्थसंकल्प तयार करण्यात येवू लागला. दरम्यान, १९२४ मध्ये इस्ट इंडीया कमिटीचे चेअरमन विल्यम एक्ववर्थ यांनी रेल्वेअर्थसंकल्पाला युनियन बजेटपासून वेगळे केले होते. तेव्हापासून ते आजपर्यंत रेल्वेचे अर्थसंकल्प हे वेगळेच सादर करण्यात येत होते.

भारतीय रेल्वेच्या निर्मितीनंतर जवळपास ५० वर्षानंतर अर्थात १९०९ मध्ये रेल्वेत शौचालये तयार करण्यात आली. रेल्वे प्रवासादरम्यान ओखिल चंद्र सेन या प्रवाशाने आपल्या वाईट अनुभवाविषयी साहिबगंज विभागीय कार्यालयास पत्राव्दारे माहिती दिली होती. त्यानंतर या पत्राची दखल घैत ब्रिटीश सरकारने रेल्वेत शौचालयांची सुविधा सुरू केली. सेन यांनी लिहीलेले पत्र आजही भारतीय रेल्वे संग्रहालयात ठेवण्यात आले आहे.

आशियात सर्वात मोठे भारतीय रेल्वेचे जाळे आहे. तसेच जगात एकाच मॅनेजमेंटच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणारी भारतीय रेल्वे ही जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या भारतात ११५००० किमीचे रेल्वे रुळ आहेत. दररोज जवळपास १२,६१७ रेल्वे धावतात. तसेच २३ लाख प्रवासी रोज रेल्वेचा प्रवास करतात. भारतीय रेल्वे रूळाची एकूण लांबी ही ६४ हजार किमी एवढी आहे. तसेच यार्ड, साइडिंग्स या सर्वांना जोडून रेल्वेरुळाची लांबी ही १ लाख १० हजार किमीपेक्षा जास्त आहे. दरम्यान, आजही जगातील सर्वात जुन्या वाफेवरची रेल्वे ही आजही भारतात धावते. या रेल्वेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद करण्यात आली आहे. फेअरी क्विगन नावाची ही रेल्वे सध्या नवी दिल्ली ते राजस्थान दरम्यान धावते तसेच या रेल्वेला आंतरराष्ट्रीय स्तरावर हेरिटेज ऍवार्डने सन्मानित करण्यात आले आहे.

जुलै १९८६ मध्ये भारतीय रेल्वे मंत्रालयाने पहिल्यांदा रेल्वेला आधुनिकतेचा टच दिला. आणि रेल्वेची सर्व माहिती ही सीआरआयएस आणि आयसीआरएस व्दारे करण्यात आली. या संगणकीय जोडीमुळे भारतीय रेल्वेचे पुर्णपणे रुपडेच बदलून गेले. त्यानंतर भारतीय रेल्वेच्या प्रगतिचा आलेख चढतच गेला. भारतीय रेल्वेचा शुभंकर म्हणून भोलू हत्तीला ओळखले जाते. हे एक कार्टून असून ज्याच्या हातात हिरवा कंदील देण्यात आला आहे. या हत्तीच्या प्रतिकास भारतीय रेल्वेच्या १५० वर्षाची पुर्तता झाल्याच्या पार्श्व भूमीवर १६ एप्रिल २००२ मध्ये बंगळूरूमध्ये प्रदर्शित करण्यात आले होते. त्याच्या बरोबर एका वर्षानंतर अर्थात २००३ मध्ये सरकारकडून या भोलू हत्तीला अधिकृतपणे प्रतिक असल्याचे घोषित करण्यात आले.

२०१४ मध्ये प्रति तास १६० किमी वेगाने चालणाऱ्या रेल्वेचे यशस्वी चाचणी घेण्यात आले होती. याच्या काही महिन्यानंतर लगेच सेमी हाय स्पीड ट्रेन गतिमान एक्सयप्रेसची चाचणी घेण्यात आली. ज्यामध्ये दिल्ली ते आग्रा हा प्रवास ९० मिनीटात पार करण्यात या रेल्वेला यश आले होते. या ट्रेनमुळे जवळपास प्रवाशांचे ३० मिनीटे वाचली. नवी दिल्ली भोपाळ शताब्दी एक्साप्रेस ही सध्या सर्वात वेगाने धावणारी रेल्वे आहे. या रेल्वेचा वेग हा १५० किमी प्रति तास असून ही रेल्वे फैजाबादवरून आग्राला पोहचते. तर दुसरीकडे मेतुपलयम ऊटी नीलगिरी पॅसेंजर ही देशातील सर्वात कमी वेगाने धावणारी भारतीय रेल्वे आहे. या रेल्वेचा वेग हा १० किमी प्रति तास आहे. भारतीय रेल्वेमध्ये नवी दिल्ली रेल्वे स्टेशनमध्ये जगातील सर्वात मोठे रूट रिले इंटरलॉकिंग सिस्टीम आहे. याच सिस्टीमची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, भारतात ओडीशातील एका रेल्वे स्टेशनला सर्वांत छोटे नाव अर्थात ‘इब’ असे नाव आहे. तर दुसरीकडे सर्वात मोठे रेल्वे स्टेशनचे नाव म्हणून ‘व्यंकटनरसिंहराजुवारीपटा’ या स्टेशनला ओळखले जाते. या स्टेशनच्या नावात तब्बल २९ अक्षरे आहेत. हावडा – अमृतसर ही रेल्वे आपल्या निश्चीनत ठिकाणा पर्यंत पोहचताना जवळपास १११ ठिकाणी थांबते. तसेच आणखी एक बाब म्हणजे गोरखपुरमध्ये जगातील सर्वात लांब अर्थात १३६६.३३ मिटरचे प्लॅटफॉर्म आहे. सध्या देशात त्रिवेंद्रम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स प्रेस ही कुठेही न थांबता सर्वांत लांब पल्ल्याची रेल्वे आहे. ही रेल्वे वडोदरा-कोटा दरम्यानचा ५२८ किमीचा प्रवास जवळपास ६.५ तासात पुर्ण करते. तसेच भारतीय रेल्वेतून लाखो लोकांना रोजगार मिळतो अशा क्रमवारीत ही जगातील ९ व्या क्रमांकावर आहे.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..