ध्येय असणे हे फार महत्वाचे आहे कारण त्यातूनच तयार होणारा नकाशा तुमच्या आयुष्याला दिशा देतो. ध्येय तुम्हाला तुमच्या संपूर्ण वाढीसाठी विकासासाठी आव्हान तयार करतात. ध्येय तुम्हाला कधी काळी तुम्हाला अशक्य कोटीतील वाटणाऱ्या गोष्टी साध्य करण्यास मदत करतात. स्वतःचे वैयक्तिक ध्येय ठरवणे फार आवश्यक आहे कारण जर तुम्ही तसे नाही केलेत तर बऱ्याचदा तुम्ही तुमचा वेळ व काम इतरांची ध्येय साध्य करण्यासाठी खर्च करता.
आता ध्येय ठरवताना हे पाहणे सुध्दा महत्वाचे आहे ते पाहणे की आपण काही चुका तर करीत नाही ना. चला जरा आढावा घेऊ या की ध्येयसिध्दी करताना तुम्ही खाली दिलेल्या काही चुका करता का?
तुम्ही तुमचे ध्येय लिहून न काढणे.
जर तुम्ही तुमचे ध्येय लिहून काढत नसाल तर ते तुम्ही तुमच्या लक्षात ठेवणे फार कठीण आहे. तुम्ही उगाचच अडचणी निर्माण करता त्या गोष्टींसाठी, कामांसाठी जी खऱ्या अर्थाने फोकस देऊन केली पाहिजेत आणि तुम्ही बऱ्याचदा दिवसभरातल्या अनावश्यक गोष्टींमध्ये, कामांमध्ये अडकून पडता.
जर तुम्ही तुमची ध्येय लिहून काढलेत तर ते लक्षात ठेवणे सोप्पे जाते. तुम्ही तुमचे ध्येय लिहून काढलेत तर ते ध्येय अधीक विस्तारीत व विकसित करणे फार सोप्पे जाते आणि यामुळे आणखीन नवीन ध्येयांची निर्मीती होते जी बऱ्याचदा तुमच्या मेंदूत नुसतीच घोळत असतात. तुम्ही तुमचे ध्येय लिहून काढल्याने तुम्हाला स्वतःला स्वःतालाच अधिक स्पष्ट होत जाते की तुम्हाला नक्की काय हवे आहे.
ध्येय वारंवार आठवण्यासाठी कोणतीही काहीच पध्दत निर्माण न करणे.
ध्येय लिहून काढणे ही एक चांगली सुरुवात आहे. पण फक्त पाच सहा दिवसांच्या पलीकडेही तुम्हाला तुमचे ध्येय लक्षात ठेवण्याकरीता व वारंवार आठविण्याकरीता काही पध्दत निर्माण करावी लागते. अन्यथा अगदी खात्रीपुर्वक तुम्ही तुमचे ध्येय काही दिवसांकरीता अथवा काही आठवड्यांकरिता विसरण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि मग इथेच तुमचा ध्येयांचा प्रवास संपतो.
आपण सध्या आधुनिक तंत्रज्ञान युगात वावरत आहोत त्यामुळे इतर अनेक गोष्टींनी तुम्ही तुमचे ध्येय वारंवार आठवण्यासाठी प्रयत्न करू शकता. जसे तुमच्या ध्येयाचे चित्र निर्माण करा व ते तुम्ही जिथे जिथे जाता तिथे तिथे तुम्हाला वारंवार ते नजरेस पडेल अशा जागांवर चिकटवा. जसे बाथरूम, आरसा, कम्प्युटर वै वै …… जसे तुम्ही तुमच्या मोबाईलचा वापर करून तुमच्या ध्येयांचा रिमांइडर सेट करून ठेऊ शकता. तुम्ही तुमच्या कल्पकतेने अनेक मार्ग अवलंबत हे नक्की करू शकता, महत्वाचे हेच आहे की तुम्हाला तुमची ध्येय वारंवार आठवण्यासाठा काही पध्दती नक्कीच निर्माण करा.
वारंवार ध्येयन वाचणे,ध्येयाचा आढावा न घेणे.
हा एक असा प्रवास आहे तुमचा ध्येय व ध्येयसिध्दिी करण्याचा ध्येय ठरविण्याचा. वारंवार ध्येयन वाचणे, ध्येयाचा आढावा न घेणे हे वरील दोन चुकांच्या जवळपासचीच एक चुक आहे.
ध्येय लिहीणे व ती ध्येय वारंवार आठवण्यासाठी पध्दत निर्माण करणे हे चांगलेच. परंतु वारंवार आपले ध्येय वाचणे व ध्येयाचा आढावा घेणे हेही तितकेच महत्वाचे ज्यामुळे आपण नक्की कुठे आहोत हे लक्षात येते. या अॅक्टीव्हीटीमुळे आपल्या झालेल्या चुका, त्यातून मिळालेले लींग यामुळे ध्येय अॅडजेस्ट करणे अथवा ध्येयात वा कृतीमध्ये बदल करणे शक्य होते. वारंवार ध्येय वाचल्याने व त्याचा आढावा घेतल्याने तुम्हाला कठीण परिस्थीतीतही मार्गपथावर रहता येते व जेव्हा खऱ्याअर्थाने एक्स्ट्रा मोटीव्हेशनल डोसची गरज असते ती मदत तुम्हाला मिळते.
सांगा तुम्ही कितीवेळा तुमची ध्येय वाचता, त्याचा आढावा घेता. या प्रश्नाची निरनिराळी उत्तरे नक्कीच येतील.जगातील अनेक मान्यवर व यशस्वी व्यक्ती नेहमीच सांगतात की दररोज सकाळी तुम्ही तुमची ध्येय वाचली पाहिजेत व तुमच्या ध्येयांचाआढावा घेतला पाहिजे.
जर तुमच्या ध्येयामध्ये व त्याच्या कृतीमध्ये काही अंडेजस्टमेंट अथवा बदल नसतील तर ती दररोज कमीतकमी लिहून काढा. नुसता ध्येयांचा विचार करत बसण्यापेक्षा ती लिहून काढल्याने तुम्ही तुमच्या मेंदूवर तुमच्या ध्येयाची एक छाप निर्माण करता. खऱ्या अर्थाने ध्येय लक्षात ठेवण्याकरीता तुम्ही तुमच्या ध्येयाचे एक कॅलेंडरच निर्माण करा.
सुस्पष्ट ध्येयन ठरविणे.
सुस्पष्ट ध्येय ठरविणे, ध्येयाचे मोजमाप तयार करणे व वर्तमानात ध्येयांचा विचार करणे.
तुम्हाला नक्की काय साध्य करायचे आहे हे तुमचे ध्येयाचे चित्रजेवढे सुस्पष्ट तेवढे तुमचे तेथे पोहचण्याचे चान्सेस जास्त. जर तुम्ही तुमच्या ध्येयाला काही मोजमापच ठेवले नाही तर तुम्हाला कसे कळणार की तुम्ही ते कधी साध्य करणार.
मला भरपूर पैसे कमवायचे आहेत हे मोजमापविरहीत ध्येय तुम्ही पूर्णपणे साध्य करू शकत नाही हा पण मी येत्या दोन वर्षात दर महिना ५० हजार रू कमविणार हे ध्येय तुम्ही नक्कीच साध्य करू शकता.
ज्या ध्येयांचा तुम्ही विचार करता आणि जी ध्येय तुम्ही लिहून काढता ती वर्तमानकाळाला अनुसरून सुध्दा असली पाहिजेत, मी आठवड्यातून तीन दिवस कमीतकमी २० मिधावणार असे न लिहता मी आठवड्यातून तीन दिवस २० मि धावतो असे लिहा.
तुमच्या अचेतन मनाला तुम्हाला नक्की काय साध्य करायचे आहे याचे सुस्पष्ट दिशा का लागते. मी असे करेन, मी असे करणार असे जर तुम्ही तुमचे ध्येय लिहत असाल तर तुम्ही तुमच्या ध्येयांच्या मागे धावताना तुम्हाला खूप त्रासातून जावे लागेल आणि बऱ्याचदा तुम्हाला तुमच्या ताबाक्षेत्राबाहेर तुमचे ध्येय गेल्याचे तुम्हाला जाणवेल. जर खऱ्या अर्थाने तुमचे ध्येय वर्तमानकाळात तुम्हाला तुमच्या आयुष्यात आणायचे असेल तर ती वर्तमानकाळातच लिहीली गेली पाहिजेत.
ध्येयांना डेडलाईन न ठरविणे.
ध्येयांना डेडलाईन ठरविणे हे फार उपयोगाचे ठरते ते म्हणेजे हाती घेतलेले काम थोड्याप्रमाणात का होईना खऱ्या अर्थाने संपविण्यासाठी. जर तुम्ही तसे करत नसाल तर तुम्ही अधिकअधिक वेळ नुसत्याच गोष्टी करण्यात घालवत रहाल. जर तुम्ही तुमच्या ध्येयांना काही डेडलाईन देऊन कामे केलीत तर तुमच्या कडे नक्कीच थोडा वेळ उरतो. समजा उदया तुम्ही तुमच्या प्रोज्क्टला डेडलाईन देऊन काम करताना काही गोष्टी चुकीच्या घडल्या किंवा अनपेक्षीत असे काही गोष्टी समोर आल्या तर तुमच्याकडे असलेल्या उरलेल्या त्या थोड्या वेळात तुम्ही तुमचे प्रोजेक्टचे काम करू शकता.
तसेच आपल्याला बऱ्याचदा समस्या जाणवते की आपण ठरवलेली एखादी गोष्ट साध्य करायला नक्की किती वेळ लागणार आहे. अशावेळी आपण काही अनरियालास्टीक डेडलाईन ठरवतो. अनरियालास्टीक डेडलाईन ठरविणे यातून तुमचा वेळ वाचत नाही. उलट गोंधळच जास्त उडतो व चिंता, टेन्शन वाढते. अशावेळी तुमच्या अंतःप्रेरणेला नाही होईल होईल असे नुसता विचार करायला लावू नका. योग्य ती डेडलाईन ठरवा व त्या डेडलाईन पाळण्याचा कसोशीने प्रयत्न करा.
संकलन – अमोल सातपुते
Leave a Reply