चेतन भगत यांचा जन्म २२ एप्रिल १९७४ रोजी दिल्ली येथे झाला.
चेतन भगत हे इंग्रजी भाषेतून लिखाण करणारे भारतीय लेखक आहेत. नवकल्पना लेखक आणि यशस्वी कादंबरीकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. चेतन भगत यांची पहिली कादंबरी’ फाईव्ह पॉईंट समवन’ असून तिने विक्रीचे अनेक विक्रम मोडले होते.
चेतन भगत यांचे शिक्षण दिल्लीत झाले. चेतन भगत यांनी आपले पोस्ट ग्रेजुएशन नंतर इंवेस्टमेंट बैंकर म्हणून आपल्या करीयरची सुरुवात केली. सुरवातीची ३ पुस्तके (फाइव प्वाइंट सम वन, वन नाइट एट द कॉल सेंटर, 3 मिस्टेक्स ऑफ माय लाइफ) ही बँकेत नोकरी करत असताना लिहिली होती. २००९ मध्ये बँकेतील नोकरी सोडून पूर्ण वेळ लेखक झाले.
२०१६ मध्ये फोर्ब्स इंडिया मैगजीन ने टॉप-100 सेलिब्रिटीजच्या यादीत चेतन भगत यांचे नाव सामील केले होते. लेखना व्यतिरिक्त चेतन भगत यांनी ‘किक’, ‘हैलो’, ‘काई पो छे’, ‘हाफ गर्लफ्रेंड’ या चित्रपटासाठी पटकथा लिहिल्या होत्या. २०१४ मध्ये त्यांना ‘काई पो छे’ चित्रपटासाठी फिल्मफेयर बेस्ट स्क्रीनप्ले अवॉर्ड मिळाला होता. चेतन भगत अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येत असतात. चेतन भगत यांनी १९९८ मध्ये आपली क्लासमेट अनुषा सूर्यनारायण यांच्या बरोबर लग्न केले. चेतन भगत यांच्यावर लेखिका आणि योगा टीचर ईरा त्रिवेदी यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply