विसरून आठवांच्या पाऊली
तू असा येतोस कां?
तुझे नी माझे नाते
आतातरी सांगशील कां?।।
दिवस हे चालले असे
ऋतु हे प्रसवती जसे
श्वास हे जगता जगता
आंसवे ही झरतात कां?.
जल जीवनी वाहिले असे
मनभाव सारे विरले जसे
निर्माल्य सहज होता होता
भावतरंग मनी जागतात?
दैवयोगे, मनप्रीत उमलता
मूकमनभाव गुंतता गुंतता
प्रीतसुगंध दरवळता दरवळता
भावकळ्या तू तोडल्यास कां?
विसरून आठवांच्या पाऊली
तू असा येतोस कां?
तुझे नी माझे नाते
आतातरी सांगशील कां?।।
— वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. ११९.
१८ – ४ – २०२२
Leave a Reply