संत सखया अगा पांडुरंगा
कां? रे रंग तुझा हा काळा ।।धृ।।
अयोध्येचा रघुनंदन सावळा
गोकुळीचा यदुनंदन तो नीळा
म्हणुनी तुच कां रे विठुसावळा।।
नीलांबरी, घनमेघ ते सावळे
प्रांगणी खेळतो नीळासावळा
लोचनी तूच विश्वरूपी सावळा।।
निष्पाप रंगले, रुप हरिहराचे
द्वैत, अद्वैत एकरूपची झाले
वाळवंटी, रंगला स्वर्गसोहळा।।
भूधरी ध्वजपताका वैष्णवांच्या
नादती टाळमृदंग झांजचिपळ्या
विठ्ठल विठ्ठल गजर दंगदंगला।।
— वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १२०.
१९ – ४ – २०२२
Leave a Reply