रात दिसाशी जोडली
सांज कौतुके विसावली
गार झुळुकेत अंब्याच्या
उन्ह घराकडं परतली
मावळती रंगांनी माखली
सोन्याचा गोळा पंखाखाली
दडवे जशी माय द्वाड बाळास
कुणी सांगू नका कागाळी
पाखरं शुभ्र आणिक काळी
परती सोबत कातरवेळी
दाणा पाणी झाले आज
उद्याचे पाहू उद्या सकाळी
केशर काजळ छाया काळी
दाटून येते अशी संध्याकाळी
राती उमलत रातराणी
चांदणं रातीच्या केसांत माळी !!
— वर्षा कदम.
Leave a Reply