तनमन ओले अधीर व्हावे
का मोहाचे धागे गुंतावे?
का जीव हळवा व्हावा
का मोह कुणाचा मोहरावा..
का भावनांचे फुलणे व्हावे
डोळ्यांत चांदणे बहरावे,
देहाचा होम का पेटावा
हलकेच मनाचा गुंता व्हावा..
जीव व्याकुळ शीण व्हावा
नजरेत वेदनांचा पूर सांडावा,
कसला मोह हा तनुभर ल्याला
का चांदण्यांनाही मोह पडावा..
श्वास हलका अधर व्हावा
हा मोह मनास बधिर करावा,
न सुटतो फसवा मोह मायेचा
मोहात प्राण कासावीस झाला..
भूल अधर देहाला पडावी
ही मोहाची रेघ कुठे घेऊन जाई ?
श्वास अलगद असा कोंडला
भाव देह मोह रडवून गेला..
टिपूर चांदणे मोहात न्हाले
पापणीआड अश्रू ओंथबले,
देहाचा फसवा खेळ सारा
काहूर मनात डोळ्यांत वेदनेचा मारा..
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply