एक आमेरिकेच्या वैद्यकीय मासिकांत, वैद्यकीय जीवशास्त्र Biomedical Science ह्याच्यावर आधारीत एक अहवाल वजा लेख वाचण्यांत आला. लेख मनोरंजक परंतु खुप माहीतीपर होता.
पुरुष बीज आणि स्त्री बीज ह्यांच्या संयोगाने, स्त्रीच्या गर्भांत नवीन जीवाची उत्पत्ती व वाढ होऊ लागते. त्यांत दोन्ही लिंगांचे समसमान गुण एकत्रीत होतात. बस फक्त येथपर्यंतच दोन्ही बीजांचा सहभाग. नंतर मात्र गर्भ — बीजधारणा, बीजांकुर, त्यांची वाढ, नवजीवाला जन्मला घालणे, त्याला जगामध्ये स्वतंत्र अस्थित्व देऊ करणे ह्या सर्व स्त्री तत्वाशीच संबंधीत भाग असतो. पुरुषाचा सहभाग, पुरुष बीज जो गर्भधारणेतील एक भाग, येथ पर्यंतच मर्यादेंत कार्य रहाते. जरी महत्वाचे असले तरी. वैद्यकीय रीपोर्ट मधील Biological Science सांगते की कोणतेही मुल फक्त स्त्रीचेच. जीच्या गर्भामध्ये प्रथम रुजून, उगम पाऊन, मार्ग काढीत जगांत पदार्पण केलेले असते. त्या Biological Scientist नुसार नवबालकाच्या जन्मचक्रांत पुरुषांचा फक्त सात (७ %) टक्के इतका सहभाग असतो. ह्या वुलट बाकीचा त्र्याणव (९३ %) टक्के इतका सहभाग स्त्रीचा असतो.
हासू येते बघा. काय ही दादागिरी पुरुष वर्गाची ? वंश निर्मीतीमध्ये त्याचा अल्प सहभाग असतो. तरी त्याने अडदांड, रानटी, व अहंकारी वर्तनाने स्त्रीयाना सतत आणि प्रत्येक बाबतीत दुय्यम ठरविले. आपला खोटा मोठेपणा प्रस्थापित करण्याचे दुःसाहस केले आहे.
पुरुष बीज , स्त्री बीज ही दोन बीजे एक होतात. दोनचे एक हे पहीले गणित. नंतर पुन्हा एकचे दोन हे दुसरे गणित. दोनचे चार, चारचे आठ, आठचे सोळा, सोळाचे बत्तीस ह्या प्रमाणे चक्र सुरु होते. व त्यांची झेप वेगाने व पटीत होत जाते. प्रचंड वाढ व आकार घेत गर्भ वाढतो.
अचानक माझ्या डोळ्यासमोर ‘सलीम’ आला. हो ओळखलत तुम्ही. तोच ‘शहींशहा जहांगीर.’ वडील थोर शांत स्वभावाचे राजे अकबर आणि आई राजपूत घराण्यातली एक आक्रमक व्यक्तीमत्व जोधाबाई. दोघांच्या मिलनातून जन्माला आला राजकुमार शहजादा सलीम अर्थात जहांगीर. ज्याच्यामध्ये त्या Biological Scientist नुसार होते जोधाबाईचे ९३% सळसळणारे गुणधर्म. ज्याने पुढे सुंदर युवती अनारकलीच्या प्रेमापाई जन्मदात्या बापाशीपण बगावत केली होती.
७ % अकबर राजाचे व ९३ % राजपुत जोधाबाईचे गुणांक. तरी संस्कार, धर्म, परंपरा, सामर्थ्य, शक्ती, व मुख्य म्हणजे सत्ता. ह्यांच्या प्रचंड माऱ्याने त्याला राजशाही वंशावळीतच जावे लागले. ह्याला लोक मान्यता होती.
कसा टिकेल त्या रुळलेल्या वैचारीक चक्रांत तो Medico Biological Scientist. त्याच्या अभ्यासाला, सुत्राना, पहाणीला, अहवालाला, प्रथम इतर जगांतील त्याच क्षमतेच्या शास्त्रज्ञांचा वैचारीक दुजोरा हवा. हे मात्र एक इतिहासीक वैज्ञानीक सत्य आहे. की कोणत्याही प्रचलीत गोष्टीना नव्या विचारांनी जेव्हां धक्का दिला, सामान्य जनानी त्याला विरोध केला. काळ बदलला व समज वाढली की साऱ्या परंपरा बदलू लागतात.
निसर्गाची हीच यशस्वी खेळी ठरते. अज्ञानांत हे माझे म्हणणारे, ज्ञान मिळताच हे सारे तुझेच म्हणतात. पुरुष प्रधान संकल्पनेला धक्का पोहचणारा हा एक विचार असेल कां ?.
डॉ. भगवान नागापूरकर
90040798580
e-mail – bknagapurkar@gmail.com
Leave a Reply