तुझ्या मलमली मिठीत
मी अलगद मुग्ध व्हावे,
ओढ हलकेच तुझी लागता
भूल आल्हाद हृदयी जपावे
काय असेल तो रम्य क्षण
तू मिठीत मज अलवार घेता,
लाजेल मी रोमांचित होऊन
स्पर्श होईल तुझा नाजूकसा
का भूल मला पडली तुझीच
आस तुझी अंतरी लागता,
ती मिठी उत्कट अबोध व्हावी
होतो मोह तुझा अधर भावना
किती कितीक समजावू मनाला
परी गुंतून जाईल बेसावध क्षणी,
अबोल होईल मी पुरती बावरुन
व्याकुळ होईल आठवण तुझी
तू ओढून घेता घट्ट मिठीत
गंधाळून जाईल तुझ्यात काया,
मोह होतो तुझा हलकेच तो
लुटले मी मोहक भावनेत त्या
घे ओढून तू अलगद मजला
गाठ चोळीची घट्ट होता,
अलवार चुंबीता ओठ तू
रोमांच उठे तनमनात असा
वाट तुझी पाहता हलकेच
दाटेल उरात हुरहूर काही,
न कळतात भाव स्त्री चे
लागते ओढ दाटून मनी
किती कितीक मी होईल
अल्लड वेल्हाळ तुझ्यासाठी,
घेता अलवार मिठीत तू जेव्हा
मोहरुन जाशील सख्या तू असाही
स्त्री असतेच अबोल मधुर अशी
होतात हळव्या नाजूक मना,
बाहुत तुझ्या गंधाळेल लाजून मी
फुलतील तुझ्यात माझ्या लाजऱ्या खुणा
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply