ग्रीन टीच्या संशोधिका मिशियो शुजीमुरा यांचा जन्म १७ सप्टेंबर १८८८ रोजी ओकेगावा, जपान येथे झाला.
जर तुम्हाला ग्रीन टी प्यायला आवडत असेल आणि त्याचे फायदे माहित असतील, तर तुम्हाला मिशिओ शुजीमुरा बद्दल नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. शुजीमुरा या जपानी कृषी शास्त्रज्ञ आणि बायोकेमिस्ट होत्या. हिरव्या चहावरील त्यांच्या अभूतपूर्व संशोधनामुळे त्या कृषी डॉक्टरेट मिळविणारी जपानमधील पहिली महिला बनल्या.
शुजीमुरा यांना हायस्कूल मध्ये असल्यापासून विज्ञानाची आवड निर्माण झाली.१९२० मध्ये, त्यांनी आपले लक्ष वैज्ञानिक संशोधक बनण्यावर केंद्रित केले आणि होक्काइडो इम्पीरियल युनिव्हर्सिटीमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम काम करण्यास सुरूवात केली. त्यांनी सुरुवातीला रेशीम कीटकांच्या पोषणावर संशोधन सुरू केले, परंतु १९२२ मध्ये त्यांची जीवनसत्त्व संशोधक उमेटारो सुझुकी यांच्यासह टोकियो इम्पीरियल विद्यापीठात बदली झाली. इथे मिशिओने ग्रीनच्या बायोकेमिस्ट्रीवर संशोधन केले. दोन वर्षांनंतर, त्यांनी आणि त्यांचे सहकारी सितारो मिउरा यांच्या सह ग्रीन टी मध्ये ‘व्हिटॅमिन सी’ असल्याचा शोध लावला, ज्यामुळे उत्तर अमेरिकेत ग्रीन टीची निर्यात वाढली.
पाच वर्षांनंतर, शुजीमुरा यांनी ग्रीन टी मधील कडू कॅटेचिन काढून टाकले. पुढच्याच वर्षी त्यांनी ग्रीन टीमधून क्रिस्टल स्वरूपात टॅनिन काढण्यास सुरुवात केली.
ग्रीन टीच्या घटकांवरील त्यांच्या प्रबंधामुळे त्यांना १९३२ मध्ये टोकियो इम्पीरियल युनिव्हर्सिटीमधून कृषी मध्ये डॉक्टरेट दिली गेली. १९५६ मध्ये त्यना कृषी संशोधनासाठी जपान पारितोषिक मिळाले. शुजीमुरा यांनी अनेक शाळा आणि विद्यापीठांमध्ये प्राध्यापक आणि व्याख्याता म्हणून कामा केले.
मिशियो शुजीमुरा यांचे १ जून १९६९ रोजी निधन झाले. त्याच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी, गुगलने आज मिशियो शुजीमुरा यांच्या १३३ व्या जन्मदिना निमित्त त्यांचे डूडल त्याला समर्पित केले. आजच्या डूडल मध्ये, त्या त्यांच्या प्रयोगशाळेत ग्रीन टी वर संशोधन करताना दाखवला आहेत.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply