व्ही. शांताराम यांच्या सर्जनशील शैलीतून साकारलेला, सामाजिक एकात्मतेचा आणि धार्मिक सलोखा राखण्यासाठी दोन जीवाभावांच्या हिंदू-मुस्लिम शेजार्यांची कथा, “शेजारी” या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे.
गजानन जहागीरदार, जयश्री कामुलकर, केशवराव दाते, चंद्रकांत सारखे कलाकार या चित्रपटात पहायला मिळतात; तसंच चित्रपटात धरण फुटी सारखं दृश्य अनोख्या तंत्राची आणि भारतीय सिनेमाच्या “बदलत्या वार्याची” चुणूक दाखवून जातो.
प्रेम, आपुलकी, स्नेह, याबरोबरच अवीट गोडीच्या गाण्यानं शेजारी हा चित्रपट नेहमीच लक्षात राहतो. लख लख चंदेरी…. हे सुंदर गाणं याच चित्रपटातील.
या चित्रपटाचा संपूर्ण व्हिडिओ उपलब्ध झाला नाही. मात्र यातील काही गाणी येथे दाखवत आहोत.
— मराठीसृष्टी व्यवस्थापन
Leave a Reply