नवीन लेखन...

मराठी समीक्षक व विचारवंत दिनकर केशव बेडेकर

मराठी समीक्षक व विचारवंत दिनकर केशव बेडेकर यांचा जन्म ८ जून १९१० रोजी सातारा येथे झाला.

दिनकर केशव बेडेकर हे एक महान साहित्यिक, विचारवंत, तत्वचिंतक व समिक्षक होते. महाराष्ट्रामध्ये वाहणाऱ्या हजारो सामाजिक, राजकीय, साहित्यीक, तार्किक, धार्मिक, व तात्वज्ञानिक विचारप्रवाहांना व मतधारांना जोडणारा पुल त्यांनी आपल्या सिध्दहस्त लेखणीच्या माध्यमातून साकारण्याची अनोखी कसरत केल्यामुळे त्यांच्या नावाभोवती प्रसिध्दीचे एक वेगळे वलय निर्माण झाले. “किर्लोस्कर”, “स्त्री”, “नवभारत” अश्या विविध नियतकालिकांमधून त्यांनी अनेक वर्षे विपूल लेखन करत, विविध संवेदनशील विचारांना स्पर्श केला. निर्भीड व पारदर्शी लेखांप्रमाणेच त्यांनी केलेली साहित्य समिक्षा देखील आज त्या विषयांसाठी मार्गदर्शक मानली जाते. “नवकाव्य”,”नवकथा”,”सौंदर्यमीमांसा”,”अस्तित्ववाद”,”चित्रकलेतील नवप्रवाह” अशा वेगवेगळ्या विचारप्रणालींचे उत्खनन करून त्यात आपल्या बुध्दीचा व तात्विक निकषांचा अर्क टाकून त्याचा अर्थ सुध्दा रसिकां पर्यंत पोहोचविला. दिनकर बेडेकरांच्या लेखणीने त्यांच्या नियमित वाचकांच्या मनातील प्रगल्भ विचारांची दालने उघडण्याचा सदैव प्रयत्न केला, असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही. भारताच्या राजकीय, सामाजिक व तार्किक सक्षमीकरणाचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून, बेडेकरांनी तब्बल ६०० च्या वर लेख लिहिले. हिंदी उद्योगधंद्यात राबणाऱ्या स्त्रिया व मुले (१९३६), संयुक्त महाराष्ट्र (१९४७), सुमित्रानंदन पंत (१९४८), अणुयुगातील मानवधर्म (१९७१) , टूवर्डस अंडरस्टॅंडिग गांधी (१९७५), धर्मचिंतन (१९७७) आणि धर्मश्रध्दा: एक पुनर्विचार (१९७७) ही त्यांची महत्त्वाची अन्य पुस्तके. समाजवाद प्रेरणा व प्रक्रिया हा बेडेकरांच्या गौरवार्थ काढण्यात आलेला ग्रंथ १९७१ मध्ये प्रसिद्ध झाला. “आधुनिक मराठी काव्यः उदय, विकास, आणि भवितव्य” तसेच “अस्तित्ववादाची ओळख” ही स्वतंत्र पुस्तकेदेखील दिनकर बेडेकरांनी लिहिली होते. स्वातंत्र्योत्तर काळातील एक आघाडीचे तत्त्वचिंतक समीक्षक ह्या नात्याने त्यांनी मांडलेल्या प्रमेयांना कायमची विचारार्हता लाभलेली आहे.

दिनकर केशव बेडेकर यांचे २ मे १९७३ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे दिनकर केशव बेडेकर यांना आदरांजली.

— संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..