नवीन लेखन...

बेवारशी

प्रसिद्धीपत्रक केराच्या टोपलीत जातं. पंधरा दिवस वाट पाहिली जाते आणि ज्या व्यक्तीला त्याचे नातेवाईक, मित्रमंडळी विसरलेली असतात अशी व्यक्ती, शेवटी बेवारशी ठरते आणि त्यानंतर त्या प्रेताची बेवारशी म्हणूनच विल्हेवाट लावली जाते. काही इलाज नसतो.


         र पंधरा दिवसानी मुंबई महानगरपालकेचे आरोग्य खाते एक दोन ओळींच प्रसिध्दीपत्रक काढत. हे प्रसिध्दी पत्रक सर्व वर्तमानपत्र आणि दूरदर्शन, रेडिओच्या कार्यालयात नेऊन देण्यात येत. पण या प्रसिध्दपत्रकाला कधी प्रसिध्दी मिळत नाही. त्यात काय छापायच, असा विचार असतो. कारण ते पत्रक प्रसिध्दीला देताना ते छापल पाहिजे, असा आग्रह नसतो. नियमांचा एक भाग म्हणून ते दोन ओळींच प्रसिध्दीपत्रक काढल जाते आणि ते केराच्या टोपलीत टाकल जात.  आरोग्य खात्याच रेकॉर्डमध्ये नोंद होते. कारण कायद्यानुसार असे प्रसिध्दीपत्रक काढल पाहिजे, अशी अट आहे. त्याशिवाय प्रेताची विल्हेवाट लावत येत नाही आणि अशी बरीच बेवारशी प्रेंत रुग्णालयात जमा होतात.

प्रदुषणग्रस्त शहरात दम्यानं थैमान घातल नाही. तर आश्चर्यच. टीबी झालेल्या रुग्णांची खास सोय करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे एक खास रुग्णालय आहे. बर ज्यांचा रोग फार बळावतो त्यांना बराच काळ इस्पितळात राहाव लागत. वर्षानुवर्ष इस्पितळात राहणारे रुग्ण असतात. काही दाखल केल्यानंतर मरण पावतात.

रुग्णालयाच्या व्यवस्थापनापुढे प्रश्न येतो. मरण पावलेल्या मृतांच करायच काय? कारण काही दिवसानंतर त्याला पाहायला येणाऱ्या लोकांची संख्या रोडावते. त्याचे जवळचे नातेवाईक सुध्दा त्याला विसरुन जातात. घरात नको, इस्पितळात बरा, असा विचार करतात. आपल्या व्यापात गर्क होऊन जातात.

इस्पितळात दाखल करताना कुणी तरी बरोबर आलेले असते. व्यवस्थित नाव लिहिल जात.  पत्ता लिहिला जातो. कधी तरी शेजारपाजारची माणस रुग्णाला भरती करतात आणि निघून जातात. रुग्ण इस्पितळाचाच एक भाग होऊन जातो आणि तिथल्या कर्मचाऱ्याच्या मर्जीवर दिवस मोजतो.

रुग्ण मरण पावल्यावर व्यवस्थापक त्यांच्याकडे नोंद असलेल्या पत्त्यावर पत्र पाठवतात. रुग्ण मरण पावलेला आहे. तरी प्रेत ताब्यात घ्यायला याव. पंधरा दिवस वाट पाहिल्यावर आणखी एक पत्र पाठवल जात. त्यालाही उत्तर आल नाही तर महिन्याभरात शेवटी नाइलाजाने रुग्णाच नाव व पत्ता देऊन अमुक अमुक व्यक्ती इस्पितळात मृत पावलेली आहे. त्याचा रेकॉर्डमधील पत्ता देऊन कुणी नातेवाईक असल्यास त्यांनी प्रेताचा ताबा घ्यावा, अस आवाहन करण्यात येत.

सुरुवातीला वृत्तपत्रात हे प्रसिध्दपत्रक येत असे. काही वेळा नातेवाईक किंवा शेजारी पाजारी येऊन प्रेत ताब्यांत घेत. पण दहातून एखादीच अशी घटना घडत असे. नेहमीच झाल्यावर आता या प्रसिध्दीपत्रकाला कुणी प्रसिध्दही करत नाही. त्यामुळे केवळ एक सोपस्कार एवढाच त्याचा अर्थ उरला आहे.

प्रसिध्दीपत्रक केराच्या टोपलीत जात. पंधरा दिवस वाट पाहिली जाते आणि ज्या व्यक्तीला त्याचे नातेवाईक, मित्रमंडळी विसरलेली असतात अशी व्यक्ती, शेवटी बेवारशी ठरते आणि  त्यानंतर त्या प्रेताची बेवारशी म्हणूनच विल्हेवाट लावली जाते. काही इलाज नसतो. त्यामुळे महापालिकेची काही इस्पितळ ही बोवारशी किंवा समाजाशी, कुटुंबाशी ज्याचा पूर्णपणे संपर्क तुटलेला आहे, अशा लोकांच आश्रयस्थान झालेली आहेत.

रस्त्यावर अपघात, जनावर मरतात. अशा जनावराना कुणी वाली उरत नाही. अशीच गाडीखाली, मोटारखाली मरुन पडलेली प्रेत रोज मुंबईत सापडतात. भुरटे चोर या मृत व्यक्तीच्या खिशातच हात घालत नाहीत तर त्यांचे कपडेही काढून घेऊन फरार होतात. अशा व्यक्तींचा ठावठिकाणा लागणार कसा. त्याची ओळख पटणार कशी? अशी ओळख न पटलेली प्रेतही शेवटी शवागारात जमा पडून राहतात. त्याची नोंद पोलिसाना प्रसिध्दीपत्रकात होते. ती छापली जातातच, अस नाही आणि सर्व सोपस्कार पूर्ण झाले, की अशा ओळख न पटलेल्या बेवारशी प्रेतांची विल्हेवाट लावायला प्रेतागारांचे कर्मचारी मोकळै होतात.

अशी पुलाखाली, रस्त्याच्या कडेला, स्टेशनच्या बाकावर, इस्पितळाच्या दारात, इस्पितळात प्राण सोडणारी बेवारशी प्रेत ओळख न पडताच नाहीशी होतात. त्यांच्या मागे दोन अश्रू ढाळायलाही कुणी उरत नाही.

-प्रकाश बाळ जोशी

आज दिनांक ४ ऑगस्ट १९९४

प्रकाश बाळ जोशी
About प्रकाश बाळ जोशी 46 Articles
प्रकाश बाळ जोशी हे ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्टीय ख्यातीचे चित्रकार आहेत.
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..