मरीन लाइन्सजवळ ऑफिस आहे. त्यामुळे परत जातानाही खिडकीची जागा मिळवतो. घरी जातो. गेली पंचवीस वर्षे त्याचा हा उपक्रम चालू आहे. हातात सदोदित कोणतंतरी पुस्तक असणार. पूर्वी पु.ल. देशपांडे, वि.स. खांडेकर, गाडगीळ, सानीया अशी पुस्तक असायची. नंतर एकदम इंग्रजीवर उडी मारली.
स्टेट बँकेत काम करणारा मित्र आहे. राहतो, बोरिवलीला. सकाळच्या ठराविक लोकलने येतो. संध्याकाळी ठरलेल्या लोकलने जातो. मरीन लाइन्सजवळ ऑफिस आहे. त्यामुळे परत जातानाही खिडकीची जागा मिळवतो. घरी जातो. गेली पंचवीस वर्ष त्याचा हा उपक्रम चालू आहे. हातात सदोदित कोणत तरी पुस्तक असणार. पूर्वी पु. ल. देशपांडे, वि. स. खांडेकर, गाडगीळ, सानीया अशी पुस्तक असायची. नंतर एकदम इंग्रजीवर उडी मारली. त्यानंतर हूडली चेस, पेटी मेसन- त्यानंतर आर्थर हे, जफर्स आर्चर अशी हलकी फुलकी वेगवान पुस्तक. त्याच्या हातातील पुस्तकावरुन समजायच नवीन लेखक कोण जोरात आहे. पूर्वी तो नवी कोरी पुस्तक घ्याचचा आत परवडत नाही म्हणून बनावट पुस्तक विकत घेतो. बनावट म्हणजे ज्या दिवशी नवीन पुस्तक युरोप अमेरिकेच्या बाजारपेठेत येत, त्याच्या दुसऱ्या दिवशी काढलेल्या नकली पुस्तकांच आवृत्त्या मुंबईसह सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, पाकिस्तान, बांगलादेश इथल्या प्रमुख्या शहरांच्या रस्त्यावर आलेल्या असतात. त्याचा पहिला वाचक आमचा मित्र. सुविधा हॉटेलसमोर डी. एन. रोडवर त्याचा पुस्तक विक्रेता ठरलेला. गेली पंचवीस वर्ष हा पुस्तक विकत आहे, जाताना आणि येताना गाडीत वेळ घालवायचा म्हणजे वाचन. दोन वर्षापूर्वी चष्मा लागला. आता इतक वाचन केल्यानंतर काय होणार, हातात सध्या पुस्तक दिसत नाही. विचारल, बाबा पुस्तक वाचण बंद का? म्हणाला होय, डोळे बिघडले म्हणून नाही. पण एक तर परवडत नाही आणि दुसर म्हणजे आता फारसा इंटरेस्ट राहलेला नाही. ऐकून अवाक् झालो. डोळे बिघडायला कारण पुस्तक नाही तर टीव्ही, केबल, स्टार टीव्ही. रोज नवीन नवीन कार्यक्रम बघायचे. जगभर प्रवास करुन यायचा. मग पुस्तक वाचायला उत्साह कुणाला. पूर्वी आर्चरच्या पुस्तकातील लंडन, युरोपमधील वर्णन वाचताना मजा वाटायची. त्याच एक आकर्षण असायच. आता स्टार टीव्ही लावला, की संबंध जग आपल्या दिवाणखाण्यात येते. मग त्यासाठी पुस्तक वाचायची गरजच उरली नाही आणि किमती काय वाढल्यात पुस्तकांच्या. मूळ पुस्तक १०० पानांच का असेना, दोनशेच्या खाली नाही आणि नकली मालसुध्दा ५० रुपयांच्या खाली येत नाही. दोन दिवसात माझ एक पुस्तक संपत. मग दर दोन दिवसाला एक पुस्तक या वेगाने वाचन परवडणार आहे का?
दुसर, लोकलमध्ये आता वाचन जमत नाही. फार संध्याकाळचे पेपर्स चाळण किंवा शब्दकोड सोडवण या पलिकडे काही जमत नाही. खूप गदी असते. पुस्तकावर सावली पडते. खिडकीतूनही बरोबर उजेड येत नाही. मरीन लाईन्सला चढूनसुदा खिडकीशेजारी जागा मिळत नाही. मग कसल वाचन करता. त्याऐवजी चक्क एक झोप काढतो. झोप जरी आली नाही तरी डोळे मिटून शांतपणे बसून राहतो. तेवढीच डोळयांना विश्रांती मिळते. घरी गेल्यावर मग टीव्हीवरचे आवडते कार्यक्रम पहायला मिळतात. एकूण काय, तर हातातल पुस्तक गायब. पूर्वी दिवाळीच्या मोसमात दिवाळी अंक असायचे. ते सुध्दा कमी झालेत. मराठीत काही नवीन, चांगल लिहूनच होत नाही. मराठी लेखकांच अनुभवविश्वच मोठ कोड आहे, त्याला ते तरी काय कारणार आणि मनाचा ठाव घेण्यासाठी जी तपश्चर्या लागते तिचा अभाव. त्यामुळे मराठी काय आणि इंग्रजी काय, एकंदर वाचन बंदच.
वाचन बंद ही फक्त आमच्या मित्राच्या बाबतीत घडलेली घटना आहे अस नाही. एकंदरच वाचनाची आवड कमी झालीय. दूरदर्शनच अतिक्रम्ण हे प्रमुख कारण दिल जाते. शाळे-शाळेतून आता संगणकाच प्रशिक्षणही दिल जातय, त्यामुळे वाचण्यापेक्षा बघण्यावर जास्त भर. अनेक पुस्तकांची दुकान गेल्या दहा वर्षात भराभर बंद पडलीत. त्या जागी व्हिडीओ कॅसेटची दुकान आलीत.
जाता- येता पूर्वी चाकरमान्यांच्या हातात टाइमपास म्हणून का होईना, पुस्तक दिसायची. आता दिसतात का बघा. लोकलच्या गर्दीतही पत्ते खेळणारे किंवा शब्दकोडी सोडवणारे दिसतील, पण पुस्तक वाचणारा विरळाच. पुस्तकाच जवळजवळ उच्चाटनच झालेल दिसतय.
-प्रकाश बाळ जोशी
आज दिनांक ११ ऑगस्ट १९९४
Leave a Reply