ज्येष्ठ चित्रकार आर.व्ही. ऊर्फ बाबा पाठक जन्म १३ जून १९१५ रोजी सातारा येथे झाला.
बाबा पाठक यांनी चित्रकलेच्या अभ्यासासाठी जगभर प्रवास केला. निसर्गाची नानाविध रूपे त्यांनी चित्रांकित केली. मोने, फान घो, तुलुस लोट्रेक, देगा यांचा तसेच एन.सी. बेंद्रे यांच्या कामाचा त्यांच्यावर प्रभाव आहे. जलरंग, पेस्टल, तलरंग अशा माध्यमांतून त्यांनी काम केले.
पाठक हे औंध संस्थानाचे शासक भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या आश्रयास असलेल्या अनेक चित्रकार-शिल्पकारां पैकी एक होते. देवधर मास्तर, माधवराव सातवळेकर, व्ही.के. पाटील हे बाबा पाठकांचे सुरुवातीचे कलागुरू होते. पुढे पाठकांनी बडोद्याच्या कलाभवन या संस्थेमधून चित्रकारितेतील पदविका प्राप्त केली.
बडोद्याहून इ.स. १९४० मध्ये मुंबईत आल्यानंतर बॉम्बे आर्ट सोसायटी गॅलरीमध्ये बाबा पाठक यांनी भरविलेले प्रदर्शन खूप गाजले होते. हा काळ स्वातंत्र्यसमराचा होता. त्यापासून अलिप्त राहणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी पुण्यात आल्यावर स्वातंत्र्यचळवळीत उडी घेतली. त्यांच्या अटकेचे वॉरंट निघाल्यावर बाबा काही वर्ष भूमिगत राहिले.
कला, प्रयोगशीलता आणि व्यावसायिकता यांचा मेळ घालत बाबा पाठक हे कोल्ड सिरॅमिक्स आणि म्यूरल्सच्या विश्वात प्रसिद्ध झाले. त्यांच्या कलाकृती देशात तसेच विदेशात अनेक ठिकाणी विराजमान आहेत.
जलरंग, पोस्टल, तैलरंग अशा माध्यमातून त्यांनी काम केले. त्यांच्या या कलाकृती देशात सर्वत्र तसेच हाँगकाँग, दुबई, सिंगापूर येथेही लावल्या गेल्या. त्यांनी काही काळानंतर हा व्यवसाय थांबवुन पुन्हा चित्रकलेचा अभ्यास सुरू केला होता.
बाबा पाठक यांचे १९ जून २०१५ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply