ग.दि. माडगूळकर यांच्या दर्जेदार लेखणीतून साकार झालेली अनमोल कलाकृती म्हणजे १९५२ साली प्रदर्शित झालेला लाखाची गोष्ट हा चित्रपट. या चित्रपटाचे दिग्दर्शन होते राजा परांजपे यांचे. तर राजा परांजपे स्वत: नायकाच्या भूमिकेत होते, या व्यतिरिक्त राजा गोसावी, दामु अण्णा मालवणकर या कलाकारांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाची कथा एका तरुण मुलाभोवती फिरते ज्याला एक मुलगी प्रचंड आवडते. आणि या चित्रपटात वळण तेव्हाच येते ज्यावेळी त्या मुलीचा बाप लग्नासाठी मुलासमोर अटी घालतो. सोबतच एक लाख रुपये देऊन ते योग्यरित्या खर्च करायचे अशी ही विचित्र अट असते. पुढे ते पैसे खर्च करताना काय गमती जमती होतात हे सर्व या चित्रपटात बघायला मिळते.
चला तर मग पाहूया, लाखाची गोष्ट या सिनेमातील एक दृष्य..
—
Leave a Reply