नवीन लेखन...

मर्यादा पुरुषोत्तम

रामायण हे आज अगदी घराघरात खडानखडा माहिती झालंय यामध्ये प्रमुख वाटा रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेचा आहे. तसंही लहानपणी शाळेच्या धड्यातील वाचनातून, चित्रपटातून ते समोर येतच राहिलं.
राम हा पूर्णपुरुष आहे. तो एका वचनाधीन राज्यकर्त्यांचा अज्ञाधारक पुत्र आहे. ज्या कैकयीमुळे त्याला थोडंथोडकं नव्हे तर चौदा वर्ष वनात जावं लागलं अशा आईविषयी कणभरही मनात किंतू, राग न धरणारा मुलगा आहे. तो एकपत्नीव्रत घेतलेला निष्ठावंत पती आहे. तो न भूतो न भविष्यती असा, आपल्या भावासाठी क्षणभरात राज्याचा त्याग करणारा प्रेमळ बंधू आहे. आपल्या पत्नीविषयी अपार प्रेम आणि विश्वास असलेला हा पती जेव्हा राज्यकर्ता म्हणून सिंहासनावर बसतो त्यावेळी आपल्या पत्नीविषयी प्रजेच्या मनात आलेला किंतू जाणून, आपल्या दुःखाचं प्रदर्शन न करता स्वतःच्या पत्नीला पुन्हा वनात पाठवणारा एक शासक आहे. शरणार्थी म्हणून आपल्याकडे आलेल्या शत्रूलाही उदार मनाने क्षमा करणारा सेनानायक आहे. नर आणि वानर यांच्या सेनेसह शत्रूशी लढणारा तो एकमेव योद्धा आहे. लंकेवर विजय प्राप्त केल्यानंतर त्या राज्याचा जराही मोह मनात न बाळगता ते बिभीषणाकडे सुपूर्द करणारा सच्चा मित्र आहे. आणि पृथ्वीवरील आपलं विहित कार्य पूर्ण झाल्यावर निस्पृहपणे संपूर्ण राज्य भावाकडे सोपवून जलसमाधी घेणारा एक नरोत्तम आहे.
रामायणात रामातील देवत्वाचा उल्लेख फारसा न येता एक पूर्णपुरुष म्हणून तो आपल्यासमोर उभा रहातो.
शासक कसा असावा? तर कोणत्याही परिस्थितीत आपला तोल ढळू न देणारा. जनतेसाठी एक न्याय आणि शासकासाठी वेगळा न्याय असं दुटप्पी धोरण न ठेवता न्याय हा सगळ्यांना सारखाच असायला हवा हे आपल्याला रामायणातून शिकायला मिळतं. रयतेच्या गुन्ह्यासाठी शिक्षा सुनावणाऱ्या राज्यकर्त्याने आपल्याकडून घडलेल्या गुन्ह्यासाठी आपणहून शिक्षा घ्यायलाच हवी ही शिकवण रामायण आपल्याला देतं.
फक्त या कलियुगात ती शिकवण अंगीकारणार कोण हाच खरा प्रश्न आहे.
शुभं भवतु
प्रासादिक म्हणे,
— प्रसाद कुळकर्णी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..