ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते चंद्रशेखर यांचा जन्म ९ जुलै १९२३ रोजी हैद्राबाद येथे झाला.
चंद्रशेखर यांचे यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर जी वैद्य. बॉलीवूड मध्ये त्यांना ‘चंद्रशेखर साब’या नावाने हाक मारली जात असे.
खूप कमी वयात त्यांनी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. त्या मुळे त्यांना आपले कॉलेजचे शिक्षण सोडून द्यावे लागले. सुरवातीला ते तेलुगू चित्रपटात काम करत असत. त्यांचे हिंदी व उर्दू वर प्रभुत्व होते. म्हणून काही जणांनी तेलुगू चित्रपट सृष्टीतून हिंदी चित्रपट सृष्टीत नशीब अजमावण्यास सांगितले.
४० च्या दशकात ते मुंबईत आले तेथे त्यांनी ब्रिटन वेस्टर्न डान्सींग मध्ये डिप्लोमा केला. सुरुवातीला शमशाद बेगम यांच्या शिफारसीने चंद्रशेखर यांना पुण्यातील शालिमार स्टूडियोमध्ये नोकरी मिळाली. ते बॉलीवूड मध्ये काम करू लागले तो पर्यत दिलीप कुमार, राज कपूर, देव आनंद, राजेंद्र कुमार असे कलाकार प्रस्थापीत झाले होते. चंद्रशेखर यांना आपली जागा बनवण्यासाठी भरपूर कष्ट घ्यावे लागले. सुरवातीच्या काळात त्यांना अभिनेता भारत भूषण यांनी खूप मदत केली.चंद्रशेखर यांनी ५०च्या दशकात ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून करिअरला सुरूवात केली होती. पुढे त्यांनी अनेक सिनेमात त्यांनी मुख्य नायकाची भूमिका साकारली होती. व्ही शांतराम यांच्या ‘सुरंग’ या सिनेमात त्यांना हिरो म्हणून पहिला ब्रेक मिळाला होता. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
१९६६ मध्ये आलेला चित्रपट ‘स्ट्रीट सिंगर’सामील आहे ‘स्ट्रीट सिंगर’मध्ये त्यांनी दिग्दर्शन केले होते. १९५४ मध्ये ‘कवि’ व ‘मस्ताना’ असे दोन चित्रपट आले. पुढे त्यांनी‘बरा-दरी (१९५५)’, ‘बंसत बहार (१९५६)’, ‘काली टोपी लाल रूमाल (१९५९)’,’बरसात की रात” (१९६०)व ‘बात एक रात की (१९६१)’अशा अनेक चित्रपटातून अभिनय केला व शेवटी चरित्र अभिनेते म्हणून ते नावारूपास आले होते. कटी पतंग, हम तुम और वो, अजनबी, महबूबा, अलग अलग, शक्ती, शराबी, डिस्को डान्सर, नमक हलाल, द बर्निंग ट्रेन अशा हिट सिनेमात त्यांनी चरित्र अभिनेता म्हणून भूमिका जिवंत केल्या.
आपल्या करीयर मध्ये त्यांनी ११० हून अधिक चित्रपटात अभिनय केला. १९९८ साली आलेल्या ‘रामायण’मालिकेत चंद्रशेखर यांनी आर्य सुमंत यांची व्यक्तिरेखा साकारली होती. चंद्रशेखर व रामानंद सागर चांगले मित्र होते. त्यांच्या आग्रहाखातर चंद्रशेखर यांनी आर्य सुमंतची भूमिका स्वीकारली होती. या मालिकेतील ते सर्वात वयोवृद्ध कलाकार होते. त्यावेळी त्यांचे वय ६५ वर्ष होते.
चंद्रशेखर यांनी व्ही. शांताराम, नितिन बोस, देवकी बोस, विजय भट्ट, भगवान, बी.आर.चोपड़ा, प्रकाश मेहरा, मनमोहन देसाई, शक्ति सामंत, रामानंद सागर, प्रमोद चक्रवर्ती,अशा निर्मात्याच्या तसेच दिलीप कुमार, देव आनंद, राजेंद्र कुमार, भारत भूषण, दारा सिंह, राजेश खन्ना, मनोज कुमार व अमिताभ बच्चन यांच्या बरोबर काम केले आहे. टीव्ही मालिका निर्माते अशोक शेखर हे त्यांचे चिरंजीव होत.
चंद्रशेखर यांचे १६ जून २०२१ रोजी निधन झाले.
Leave a Reply