|| हरि ॐ ||
ये रे घना, घेऊन ये रे पावसा
दोन थेंबासाठी झालास का परका?
जमीन झाली कोरडी तप्त,
वारे वाहती उष्ण उष्ण
अंगा अंगाची काहिली झाली
थंड करण्या येउदेत सरी,
फुले फळे काळवंडली
वाऱ्या बरोबर उडून गेली
झऱ्यांचे ते पाणी आटले
नद्या, नाले, विहिरी सुखले
डोईवर हंडा, खाकेत कळशी
पाण्यासाठी नारी गावभर फिरती
भांडभर पाण्यावर समाधान मानती
नकोस करू अशी जीवघेणी थट्टा
असा कसा लावतोस तुलाच बट्टा
यंदा तरी येशील ना वेळेवर
दुथडी भरून वाहशील ना खंडीभर
सगळी राने होतील हिरवी,
फळे फुले येतील गोजिरी
बळीराजा आणि जनताही सुखावेल
सर्वांना तुझी किंमत कळेल,
जीवनाचे गणित आपोआप उमजेल !
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply