समाजात स्त्रीवर होणार्या अन्याया विरोधात आवाज उठवणार्या विशीतल्या विद्यार्थीनीची कथा, जिचे कुटुंब राजकारणात पूर्णत: सक्रीय आहे; पण सत्ताधारी पक्षात असूनही काही ठोस पावले न उचलली गेल्यामुळे, विद्यार्थी संघटनेची धुरा सांभाळत स्वत: एखादा अन्याय किंवा सोषितांची दु:ख दूर करण्याचा प्रयत्न मुक्ता ही मुलगी करत असते. यामध्ये कधीकधी तर तीच्या घरातूनच विरोध केला जातो. पण सर्व प्रसंगांवर मात करत निर्णय घेण्याचे धारिष्ट ती दाखवते. या चित्रपटात मुक्ता या पात्राची भूमिका साकारली आहे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने. चित्रपटात डॉ.श्रीराम लागू, रिमा लागू, विक्रम गोखले, अविनाश नारकर या कलाकारांच्या प्रमुख भूमिका असून डॉ. जब्बार पटेल या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
चला तर मग पाहूया, १९९४ साली आलेला मुक्ता हा चित्रपट..
भाग-१
भाग-२
—
Leave a Reply