६ मार्च, इ.स. १९५३ ला साने गुरुजींच्या जीवनावर आधारीत श्यामची आई हा चित्रपट पडद्यावर झळकला. १९५३ साली प्रदर्शित झालेल्या श्यामची आई या चित्रपटातील हे गाणे. हे गीत गायले आहे आशा भोसले यांनी. या गाण्याला संगीत दिले होते वसंत देसाई यांनी. तर गाण्याचे बोल होते वसंत बापट यांचे. इ.स. १९५४ साली या चित्रपटाला भारतीय केंद्रशासनातर्फे दिला जाणारा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार या चित्रपटाला मिळाला. ‘श्यामची आई’ हे मराठी मन स्मरणातिल अजरामर ‘चित्र’. त्यातील ‘भरजरी ग पिताम्बर.. हे गीत म्हणजे भगिनी प्रेमाचे उदात्त उदाहरण.
भरजरी गं पितांबर दिला फाडून । द्रौपदिसी बंधू शोभे नारायण ।
सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहिण । विचाराया गेले नारद म्हणून ।
बोट श्रीहरीचे कापले ग बाई । बांधायाला चिंधी लवकर देई ।
सुभद्रा बोलली, शालू नि पैठणी । फाडूनी का देऊ, चिंधी तुम्हांसी मी ।
पाठची बहिण झाली वैरीण । द्रौपदिसी बंधू शोभे नारायण ।
—
Leave a Reply