जयदेव जयदेव जय जय तात्यारावा.
बुडाला धर्म त्यांस सावराया धावा.
जय देव जय देव….
प्रथम देशाकरीता लंडनला गेला.
धिंग्राकरुनी कर्झन वायली मारीला.
समुद्र उड्डाण करुनी हाहाकार केला.
हादरले आंग्ल पाहूनी तव ज्वाळा.
जय देव जय देव….
ज्ञानेश्वरे जैसे भिंत चालवीली.
काव्यसुमने तुम्ही तिज सजीव केली.
स्वर्गाहूनी सुंदर अंदमान झाला.
कोठडीचा देव्हारा तवपदकमले झाला.
जय देव जय देव….
थरथर कांपे रिपू तुम्हां पाहून.
धडधड ह्र्दयी भिंऊ आंग्ल पळाला.
झळझळ शोभे कंठी स्वातंत्र्यमाळा.
जय देव जय देव….
माजला औरंग्या भूमाता छळीली.
कॉंग्रेजीपाशी मरणोन्मुख झाली.
करुणारती ओवाळू तुज सावरकरा.
हिंदुरक्षका म्लेंछभक्षका शरण आलो राया.
जय देव जय देव….
जयदेव जयदेव जय जय तात्यारावा.
बुडाला धर्म त्यांस सावराया धावा.
जय देव जय देव….
आरती संकल्पना – जयेश शत्रुघ्न मेस्त्री
— श्री.जयेश शत्रुघ्न मेस्त्री
नमस्कार.
जयेश मेस्त्री यांनी रचलेली स्वातंत्र्यवीर सावरकरांची आरती वाचली. मला फारच भावली. सावरकर हे मोठे श्रद्धेय व्यक्तिमत्व. असा पुरुष अनेक शतकांत एखादाच होतो. केवळ political कारणांमुळे त्यांच्यावर फार फार अन्याय झाला ; BRITISH RAJ मध्येच नव्हे, तर स्वतंत्र भारतातही. अजूनही त्या अन्यायचेच पूर्ण निराकरण झालेले नाहीं. पण ‘की घेतलें व्रत न हें अम्ही अंधतेनें ……….. बुद्ध्याच वाण धरिलें करिं हें सतीचें‘ असें आधींच ठरवले्या महापुरुषाला त्याचें काय ! येशू ख्रिस्ताची किंमत जगाला ३५० वर्षांनंतर कळली. सावरकरांची खरी किंमत, व त्यांनी मांडलेल्या ‘हिंदुत्वा’चा ( हिंदु धर्म नव्हे) खरा अर्थ भारताला निकट भविष्यात नक्की कळेलच. आरतीबद्दल अभिनंदन. – सुभाष स. नाईक, मुंबई