फेब्रुवारी २०१९ चा अंक हा परमपूज्य सद्गुरु कलावती आईंच्या चरणावर समर्पित करीत आहोत.
“गुरुतत्त्व एक मार्गदर्शक” या ओळीचा पदोपदी अनुभव येत आहे व हे तत्त्व सातत्याने मार्गदर्शन करीत सेवा करवून घेत आहे याची अनुनभुती येत आहे. गुरुतत्त्व मासिकाचे हे २२ वे पुष्प आहे. जे आईंच्या चरणी वाहात आहेत.
संत, महात्मे, सद्गुरु हे पृथ्वीतलावर जन्म घेऊनी प्रचार-प्रसार करीत आहे. त्याचा उद्देश हाच आहे की प्रत्येक जीव हा शीव व्हावा म्हणजे आनंदी व्हावा त्यासाठी त्याने साधना करावी यासाठी पृथ्वीतलावरील प्रत्येक संत मार्गदर्शन करीत असतो. असेच मार्गदर्शन करुन परमपूज्य आईंनी भक्तांना “भक्ती करीत भगवंत” होण्यासाठी मार्गदर्शन केले त्याप्रमाणे साधना करून घेतली.
आईंनी भजनाच्या माध्यमातून भव सागरात अडकलेल्या भक्तांना मुक्त करण्याचे साधन दिले श्रीहरिमंदिरात नामाशिवाय दुसरे काहीच चालत नाही. सर्वावर आई प्रमाणे त्यानी निरपेक्ष व निःस्वार्थपणे प्रेम केले. प्रेमाचे जीवंत स्वरुप म्हणजे परमपूज्य कलावती आई आहे. तुकारामांनी म्हटले आहे की,
“जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले ।।१।।
तोचि साधु ओळखावा । देव तेथेची जाणावा ।। २ ।।
मृदु सबाह्यनवनीत, तैसे सज्जनांचे चित्त ।।३।।
ज्यासि अपंगिता नाही, त्यासी धरी जो हृदयी ।। ४ ।।
दया करणे जे पुत्रासी, तोची दासा आणि दासी ॥५॥
असेच सर्व संत मंडळी असतात व हेच गुरुतत्त्व आहे. जे एकाच वेळी पृथ्वीतलावर अनेक रुपात प्रगट होते व ज्याला जे रूप आवडत त्या प्रमाणे संत त्याच्याकडे वळतात. मग आपल्या प्रकृतीनुसार त्यांना शिकवितात व मार्गदर्शन करतात. उद्देश एकच “सर्वेपी सुखिन सन्तु. ” “सर्व सुखी होवोत,सर्व निरोगी राहोत, सर्व शुभ राहोत कोणासही दुख: होऊ नये.” यासाठी मग पंचमहाभुतांवर सत्ता असल्यामूळे भक्तांना चमत्कार वाटावे अश्या अनुभूती देतात,उद्देश मात्र एकच असतो.
हेच गुरुतत्त्व सर्वांपर्यंत पोहचविण्याचे कार्य गुरुतत्त्व मासिकाकडून सुरू आहे. आमचा उद्देश एकच की गुरु, संत, महात्मे, सद्गुरु हे एकचआहेत, सर्व एक समान आहेत त्याच्यात कुठलेच भेदाभेद नाही म्हणून त्यांचे चिंतन करा त्यामुळे विवेक जागृत होवून साधनेत प्रगती होईल, गुरुंच्या तत्त्वाचा प्रचार प्रसार करा त्यासाठी तन, मन, धनाचा त्याग करून शेवटी संपूर्ण शरणागती पत्करुन जीवनातील चिरंतर शाश्वत असा आनंद मिळवा.
“जीवनातील खरा आनंद फक्त परमार्थात आहे हाजीवनाचा परमअर्थ सद्गुरु दाखवितात म्हणून सद्गुरुच्या प्राप्ती साठी सेवा करा, सेवे शिवाय तरणोपाय नाही.
।। श्री गुरुतत्त्वाय नमो नमः ।।
— संतोष श्यामराव जोशी.
सौजन्य: गुरुतत्व मासिक, वर्ष २रे, अंक १०वा.
Leave a Reply