सरिते सारखेच जगावे
सदैव प्रवाहित असावे
कशाचीच तमा नसावी
मुक्त निर्भयी संथ वहावे
हवे कशाला उगा चिंता
भाळीच्या सुखदु:खांची
विवेकाची कास धरावी
सत्कर्मात झोकुनी द्यावे
धनी जन्माचा तो हरिहर
फासे सारे त्याच्या हाती
क्षणाचा कां असे भरोसा
त्या अगाधा स्मरत रहावे
लाभले ते जपावे मनस्वी
साऱ्यांच्याच मनात रहावे
हवेत कशाला ते हेवे दावे
संघर्षाविना जगती जगावे
जगती मन:शांती प्रेमभाव
वात्सल्यप्रीती ब्रह्मसुखदा
ध्यास , तोच जीवा असावा
जीवाजीवाप्रती मैत्र जपावे
— वि. ग. सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १७३
२० – ७ – २०२२
Leave a Reply