दिनांक ०१ ऑगस्ट २०२२ रोजी अण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती अखंड महाराष्ट्रामध्ये साजरी करण्यात आली. अण्णाभाऊ साठे सध्या आपल्यामध्ये नाहीत परंतु त्यांचे साहित्य आज अमर आहे. साहित्यिक कधी मरत नसतो तो पुस्तक रूपाने अमर असतो. पाच वर्षांनी मंत्री संत्री बदलतील पण साहित्यिकाचे पुस्तक अथवा नाव बदलत नाही. साहित्यिकाचे नाव पिढ्यानपिढ्या जिवंत राहते वाचन संस्कृती जपत असताना. भरपूर साहित्यिकांची पुस्तके वाचाव यास मिळाली त्यापैकी अण्णाभाऊ साठे, बाबा कदम, बाबुराव अर्नाळकर, विश्वास पाटील, रणजीत देसाई, प्राध्यापक शिवाजीराव भोसले, र .वा.दिघे, रारं बोराडे, वि स खांडेकर, साने गुरुजी, द मा मिरासदार, पु ल देशपांडे, प्राध्यापक शंकरराव खरात, अशी कितीतरी मोठी लेखकांची रांग आहे. पण ही वरील मंडळी यांची पुस्तके पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटतात…।
वाचन करीत असताना अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य मनामध्ये घर करून गेले. आणि पुन्हा पुन्हा कादंबरीतील पात्रे डोळ्यापुढे येऊ लागली इतके साधे व तरळ लेखन मनाला भावून गेले. तुकाराम भाऊराव उर्फ शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट १९२० रोजी. माता वालुबाई व पिता तुकाराम साठे यांच्या पोटी. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाटेगाव या ग्रामीण खेड्यामध्ये झाला. अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी. कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकार त्यांनी तेवढ्याच ताकतीने हाताळले आहेत हे वावगे ठरणार नाही. तांत्रिकदृष्ट्या पूर्ण निरक्षर अशिक्षित अशी व्यक्ती. अशा अण्णाभाऊंनी मराठी साहित्या तील लोक वाडमय कथा, नाट्य, लोकनाट्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गैंळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले…..।
…. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं, या काव्य प्रकाराचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्वी आणि स्वातंत्र्या नंतरच्या काळात राजकीय प्रश्नाविषयी. महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळीमध्ये त्यांनी शाहिरीतून फार मोठे योगदान दिले. अण्णाभाऊ साठे यांनी ३५ कादंबऱ्या , आठ पटकथा, तीन नाटके, एक प्रवास वर्णन, तेरा कथा संग्रह, १४ लोकनाट्य, दहा प्रसिद्ध पोवाडे, व १२ उप हसात्मक लेख लिहिले. बंगालचा दुष्काळ तेलंगण संग्राम, पंजाब दिल्ली चा पोवाडा, अमळनेरचे हुतात्मे, काळया बाजाराचा पोवाडा,, माझी मैना,, हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरील छक्कड. कामगार चळवळीवरील एकजुटीचा नेता….।
… ते हिटलरच्या फॅसीझम विरोधात स्टॅलिन ग्रँड चा पोवाडा., बर्लिनचा पोवाडा, चिनी क्रांती वरील चिनी जनाची मुक्ती सेना, हे गैरवगाण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील गाजलेले.,, जग बदल घालुनी घाव, सांगून गेले भीमराव, हे गाणे अशी अनेक गाणी व कवणे अण्णाभाऊ साठे यांनी लिहिली आहेत. त्यांनी आपल्या गाण्यातून पोवाड्यातून अनेक सामाजिक, राजकीय प्रश्नांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय समस्यांना वाचा फोडण्याचे महान कार्य केले आहे. अण्णाभाऊंच्या विचारामुळे त्यांच्या प्रतिमेमुळे साहित्याला व लोककलेला फार मोठी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून इथेच थांबतो….।
-दत्तात्रय पांडुरंग मानुगडे..
Leave a Reply