मुले ब्रह्मा त्वचा विष्णू शाखायाम तु शंकर:.
पत्रे-पत्रे तु देवानाम् वृक्ष राज नमोस्तुते.
वृक्षांच्या मुळांमध्ये साक्षात ब्रह्मदेव निवास करतात. वृक्षांची त्वचेत भगवान विष्णु, फांद्यांमध्ये भगवान शंकर निवास करतात. पाना-पानात देवतांचा निवास असणार्या वृक्षराजाला मी नमस्कार करतो.
वृक्षांच्या विना मानव जातीच्या अस्तित्वाची कल्पना ही अशक्य आहे, आपल्या प्राचीन ऋषींना हे माहीत होते. वृक्ष पर्यावरणला शुद्ध करतात, घर आणि यज्ञा साठी लाकूड प्रदान करतात, क्षुधा शांत करतात आणि रोगांपासून आपल्याला मुक्त करतात (अशी आख्यायिका आहे -आयुष्यभर अध्ययन करून ही ‘चरकला’ एक ही वनस्पती किंवा वृक्ष सापडला नाही की ज्यात औषधीय गुण नाहीत).
पुराणात वृक्षांचे महत्व सांगताना महर्षि व्यास म्हणतात जो मनुष्य पिंपळ, वट आणि कडू लिंबाचे एक-एक झाड, चिंचेचे दहा, बिल्व आणि आवळ्याचे तीन-तीन आणि आंब्याचे पाच झाडे लावेल तो कधीही नरकात जाणार नाही. गीतेत ही भगवंताने ‘अश्वत्थ सर्व वृक्षाणाम’ वृक्षांमध्ये मी अश्वत्थ (पिंपळ) हा वृक्ष आहे असे म्हटले आहे. वृक्षांची महिमा सांगताना ऋषि म्हणतात एक वृक्ष दहा पुत्रांच्या बरोबर आहे. [(विष्णु धर्मसूत्र (१९/४)].
वृक्षांच्या रक्षणासाठी वृक्षांवर देवतांचे निवास स्थान आहे, ही परिकल्पना लोकांच्या मनात रुजविण्यचा प्रयत्न आपल्या प्राचीन ऋषिंनी केला. वट वृक्षावर –ब्रह्मा, विष्णु आणि कुबेर यांचे निवास तुळशी वर लक्ष्मी आणि विष्णु, सोमलता-चंद्रमा, बिल्व –शंकर, अशोक-इंद्र, आंबा –लक्ष्मी , कदंब- कृष्ण, पलाश-ब्रह्मा आणि गंधर्व, पिंपळ – विष्णु, औदुंबर – रुद्र आणि विष्णु, महुआ –अचल सौभाग्याचे आशीर्वाद देणारा वृक्ष (बंगालच्या अकाल च्या वेळी ज्या गावांत महुआची झाडे होती, तेथील गावकर्यांनी या झाडाच्या वाळलेल्या फुलांपासून बनलेल्या पोळ्या खान आपले रक्षण केले, असे एका लेखात वाचले होते).
शेवटी कवी नीरजची कवितेतील एक अंश –
खेत जले, खलिहान जले, सब पेड जले, सब पात जले.
मेरे गांव में रात न जाने कैसा पानी बरसता था.
हा अनुभव आपण आत्ताच घेतला आहे.
— विवेक पटाईत
नमस्कार पटाईत जी.
छान माहितीपूर्ण लेख.
– गीतेत अश्वत्थाचें आणखी वर्णन आहे , १५व्या अध्यायात : ऊर्ध्वमूलम् अध:शाखम् अश्वत्थम् प्राहुरव्ययम् ।
– वृक्ष हे परोपकारी असातात. याविषयीचा एक श्लोक :
पिबन्ति नद्य: स्वयमेव नाम्भम्
स्वयम् न खादन्ति फलानि वृक्षा:
धाराधरो वर्षति नात्महेतवे
परोपकाराय सताम् विभूतय: ।
– कल्पवृक्षाची कल्पनाही वृक्षाचें उपयोगित्व दाखवते.
– नीरज जी यांच्याबद्दल काय बोलावे ! त्यांचा ‘कारवाँ गुज़र गया गुबार देखते रहे’ अजरामर झालेलें आहे.
स्नेहादरपूर्वक,
सुभाष स. नाईक