मजूराचे मन कष्ट। कंटकांचे जीवन ।
कथावे ते कवण । जीवन वैफल्य ॥ १ ॥
जागा ही पाव पाखा । गेला जन्म आखा।
येथे का लाज राखा । धडूतही नसे ॥ २ ॥
यंत्राशी सांगे नाते । गरगरणारे पाते।
कष्टतो मी स्वहस्ते । त्याले मोल नसे ॥ ३ ॥
करुण हे जीवन। भीषण ते क्रंदन ।
दैन्याचेच प्रदर्शन। असे अजबच ॥ ४ ॥
जन्मभर चाकरी । खावी इमाने भाकरी ।
सत्याची कास धरी । सर्वथा अशक्य ॥ ५ ॥
असत्याचा बडेजाव। भोंदू-दांभिकाला भाव ।
ती मोठेपणाची हाव । सर्वमान्य ठरे ॥ ६ ॥
थाट खोट्याचा काय । महागाई महामाय ।
देवाघरी न्याय मिळणे मुष्किल ॥ ७ ॥
आमचे राहणीमान ग्रंथातले लिखाण ।
पुकारिती आर्तजन । आता धावा ना हो ॥ ८ ॥
– यतीन सामंत
Leave a Reply