देवा तुझ्या तराजूला एक पारडे जड का
माणसाच्या ठोकळ्याला दोन हाती माप का
दुर्जनांच्या पारिपत्या जन्मतो तो तूच ना
हिंदवीला आगऱ्याची मग सांग ना रे कैद का
शुभ्रतेच्या ज्योतीसंगे काजळी किनार का
जीवनाच्या धुंद क्षणी आसवांची धार का
बेरजेचा गोफ भाळी एखाद्या गुंफतोस
नातं नशीबी वेदनांचं एखाद्या जोडतोस
निर्जीव ठोकळ्याला विकारांची चेतना का
दिव्यत्वाच्या झेपाव्याला अपूर्णतेची झाक का
निर्मितीचा आनंद का रे वैचित्र्यात शोधतोस
पारड्याला कोण जाणे म्हणून का झुकवतोस
– यतीन सामंत
Leave a Reply