राम नाम ओठी जपता
रामराया हॄदयी वसतो…
करावा रामनामाचा धावा
तो सदैव श्वासात नांदतो…
राम नाम सागर मोक्षानंदी
दुःख वेदनांतुनी सावरतो…
राम अवतार विश्वात्म्याचा
साऱ्या ब्रह्मांडाला रक्षितो..
तो देवगुणी , सदविचारी
सकलांच्या मना उजळीतो..
विध्वंसक तो षडरिपूंचा
शाश्वती ब्रह्मांडी नांदतो…
जीवन रामनामी सन्मार्गी
जाणता जीवा मोक्ष लाभतो..
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २२९
८/९/२०२२
Leave a Reply