क्षितीज – सीमा ओलांडुन घेते नभ जलधी अवतार सागर-खर्जातून निनादे दीर्घ प्रणव झंकार .
माडांची ही झाडे कसली हा कल्पतरुच साकार सावलीत हो त्याच्या घेती मम स्वप्ने आकार .
वाळूवरच्या रेघा आणिक भविष्यातले इमले मोडता पुनरपि बांधायाचे इथेच मजला गमले .
असा मनोहर निसर्ग माझा मित्रच आहे खास या देहातिल
प्राणच माझे हा तर माझा श्वास !
— श्री.उदय विनायक भिडे
Leave a Reply