नवीन लेखन...

येथे तिरंगा विकला जातो

या वर्षीचा १५ ऑगस्ट जसा जवळ आला,डोक्यात आमच्या एक जबरदस्त प्लान चमकला !चला, या वर्षी सगळा आळस झटकुन टाकुयात,आपल्याच अंगणात डौलाने मस्त तिरंगा फडकावुयात ! भरपूर उत्साहात २ तास सगळे मॉल पालथे घातले,शेवटी कोप-यावर छोटेसे १ दुकान नजरेस पडले,’येथे तिरंगा विकला जातो’ पाटीवर लिहिले होते

!दिसते तसे नसते हे आम्हाला नंतर उमगले होते !!

दुकानदाराला म्हटले आम्ही अभिमानाने ‘तिरंगा पाहिजे एक’त्याने न्याहाळुन विचारले ‘ओरिजिनल की डुप्लीकेट’चवताळुन ओरडलो, ‘आजादी’ नंतर डुप्लीकेट कशाला फडकावणार?बसा, बसा, त्याने म्हटले, तुमच्या सारखे पुन्हा कधी केव्हा येणार?

ओरिजिनल मधे कुठला दाखवू नवा की जुना घेणार?चक्रावून आम्ही विचारले त्यात असा काय फरक असणार..?हसून त्याने मग माळ्यावरचे मोठे बण्डल उघडले !जुना तिरंगा कुणी किती वेळा फडकावला याचे गणित आमच्यासमोर मांडले !!

नविन कालच शिवून आलेत त्याने दिमाखात सांगितले !जुन्यामधे खुप ‘व्हरायटी’ आहे पुढे ज्ञान पाजळले !!मग आमच्या समोर त्याने झेंड्याचा मोट्ठा बण्डल उघडला !बोलला, हा अमिताभने फडकावलेला, मागच्या वर्षी ‘आझाद पार्क’ वर !!हा ‘शाहरुख खान’ ने फडकावलेला ‘होटल ताज’ वर !हा फडकावलेला ‘आमिर’ ने ‘मंगल पाण्डे’ च्या सेट वर !!हा झेंडा स्पेशली पॅरिसच्या फैशन डिजायनर ने शिवलाय !हात जरा संभाळुन लावा मिस्टर तुमचा हात मळलाय !!

एक मागोमाग एक त्याने खुप झेंडे दाखवले !राज कपूर ते बिपाशा बसू सगळ्यांचे पाढे वाचले !!आम्ही म्हटले भारतीय सेनेच्या ख-या शहीद ने !फडकविलेला खराखुरा तिरंगा दाखवणार?

तो बोलला ठेवला होता ना, पण यापुढे नाही ठेवणार !!तो झेंडा “कॅप्ट्न मनोज पांडेने” “कारगिल” वर फडकावला होता !अभिमानाने तेव्हा आमचा ऊर केवढ़ा दाटून आला होता !!मी ख़ास ‘पाच हजार’ रुपये मोजून तो मागवला होता !

मोट्ठ्या दिमाखात सगळ्यांसमोर या शोकेशमधे झळकावला होता !!तीन वर्षे ठेवुनहीं त्याला एकही कस्टमर दिसला नव्हता !अहो खुप कष्टाने शेवटी अडीच हजारात खपवला होता !!आम्ही म्हटले ठीकाय, नविन मधला दाखवा !

तो म्हटला कोणत्या ब्रँडचा हवाय ते आधी ठरवा !!’रीतू बेरीचा’ दाखवू की ‘मुनमुन सेन’ चा ?पॅरिसच्या डिजायनरचा की ‘मनीष मल्होत्रा’ चा ?आम्ही म्हटलो भाऊ महिन्याची १३ तारीख आहे आणि महागाई मस्त आहे !असाच झेंडा दाखवा जो आमच्या खिशाला स्वस्त आहे !!

एकच शेवटचा पीस उरलाय लगेच तुमच्या नावावर करा ! त्या आधी काउंटरवर एक हजार रुपये जमा करा !!आम्ही म्हटले एक हजार रुपये जरा जास्त नाही वाटत ? तो ओरडला तुम्हाला आर्ध्या किमतीत देतोय मिस्टर जास्त पैसे नाही लाटत !

मनात विचार आला आजादी पूर्वी झेंडा जर इतका महाग असता ! कुणी कुणी जीवाची बाज़ी लावून तिरंगा फडकावला असता ?हजार रुपये मोजण्यासाठी आम्ही स्वताला तैयार करत होतो !डोळ्यांसमोर मात्र मुलांची फी, बायकोचा रागीट चेहरा पहात होतो !!समस्या मोठी जटिल होती आणि सुटायला जरा कुटिल होती !

इतक्यात दुकानदाराचा चेहरा तोंडभर हास्याने खुलला !!जेव्हा आमचाच झेंडा एका विदेशी कपलच्या नजरेस पडला !दूकानदाराचा रंग इतक्या पटापट बदलला होता !!जणू कुबेराचा खजिनाच त्याच्या नजरेस पडला होता ! आमच्या खालचा स्टूल खसकन ओढून त्याने तिच्या खाली सरकवला !!मधाळ इंग्रजी त्यांना तुच्छ कटाक्ष आमच्याकड़े भिरकावला !इतिहासाने पुन्हा एकदा स्वताला सिद्ध केले होते !!नियतीने आम्हाला पाहुन विकट हास्य केले होते !

आमच्या पसंतीचा तिरंगा विदेशी मेमला आवडला होता !!दूकान दारानेही तेवढ्याच खुबीने त्याचा भाव बदलला होता ! इंग्रजांच्या हाती आता पैशांचा जोर होता !! पाहता पाहता तिरंगा आमचा इंग्रजांना विकला जात होता !आमचा डोळ्यांदेखत आमचा तिरंगा विकला गेला होता !!

दुकानदाराचा चेहरा शंभर डॉलर्स पाहुन कमालीचा खुलला होता !जाता जाता तिरंगा आम्हाला पुन्हा रडवुन गेला !!मनावर दुखद गोष्ट कोरुन अंतर्मुख करून गेला !डॉलर च्या तुलनेत रुपयाचा जगात आज काय भाव आहे !!कारण सगळीकडे डॉलर वाल्यांनाच मान आणि भाव आहे !म्हणायला आपण म्हणतो भारत स्वतंत्र झाला आहे !!पण आर्थिक दृष्टया आजही रूपया डॉलरचा गुलाम आहे !एमबीए घ्या, डॉक्टर घ्या, किंवा घ्या सॉफ्टवेर इन्जिनेयर,सगळ्यांचेच ठरलेले ध्येय आहे ऑनसाईटची मोट्ठी ऑफर !!

आख्या जगात जाउन हेच मग डॉलर ला अजून स्ट्रोंग बनवतात !कधीतरी कुठेतरी एखाद पारितोषिक मिळवतात !!भारताला मात्र त्यांचा कधीच काहीच फायदा होत् नसतो !तरीसुद्धा भारतीय वंशाचे म्हणून आम्ही त्यांचे गोडवे गात असतो !!


नेटवरुन येणारे अनेक फॉरवर्डस कोण लिहितं, कुठून येतात माहित नाही. मात्र ते इतके छान असतात की त्यांना इतरांपर्यंत पोहोचवण्याचा मोह आवरत नाही. या लिखाणावर कोणाचा स्वामित्त्वहक्क असल्यास जरुर कळवावे. त्याची योग्य नोंद घेतली जाईल.

— फॉरवर्डस…..

1 Comment on येथे तिरंगा विकला जातो

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..