परवा २६ जानेवारीला सार्वभौम भारताचा ७० वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. त्यानंतर तीन दिवसांनी या सोहळ्यासाठी दिल्लीत आलेल्या तिन्ही सैन्यदलाच्या तुकड्या परत आपापल्या छावण्यांमध्ये परततात. मात्र, त्याआधी दिल्लीतील विजय चौकात एक नयनरम्य, देखणा सोहळा… बीटिंग द रिट्रीट पार पडत आहे.
तिन्ही सैन्यदलांची पथके कवायतीच्या माध्यमातून आपल्या सामर्थ्याचे सादरीकरण करतात. रायसीना हिल्सवर होणाऱ्या या सोहळ्याला राष्ट्रपतींसह तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि अन्य मान्यवर उपस्थित असतात.
छावणीत माघारी जाण्याच्या या सोहळ्याची ही एक फार जुनी परंपरा आहे. याचे मूळ नाव “वॉच सेटिंग’.
युद्ध सुरू असताना सूर्यास्त झाल्यावर रणांगणावरील सैनिक आपापल्या छावण्यांमध्ये परत जात. यावेळी एक सांगीतिक समारंभ आयोजित केला जाई. त्याला बीटिंग द रिट्रीट म्हणत. हाच सोहळा प्रजासत्ताक दिनाच्या समारोपप्रसंगी रायसीना हिल्सवर होतो.
सूर्यास्ताच्या वेळी होणाऱ्या या कार्यक्रमाची भारतातील सुरुवात मात्र १९५० पासून झाली. यावेळी लष्कराच्या तिन्ही दलांचे बॅंण्ड एकच संगीत वाजवून या कार्यक्रमाची सुरवात करतात. “सारे जहॉं से अच्छा’ हे गीतही वाजवले जाते. शेवटी राष्ट्रगीत झाल्यानंतर तिरंगा उतरवला जातो आणि त्यानंतर प्रजासत्ताक दिनासाठी दिल्लीत आलेल्या लष्कराच्या तुकड्या माघारी आपापल्या छावण्यांत जातात.
या बीटिंग रिट्रीटमध्ये सैन्यदलांचे १८ बॅंड, १५ पाइप अँड ड्रम बॅंड सामील होतात. हे सर्वजण एकत्रितपणे सैन्याचे सर्वोच्च कमांडर, अर्थात राष्ट्रपतींना मानवंदना देतात.
भारतात बीटिंग द रिट्रीट १९५० पासून सुरू झाले. तेव्हापासून आतापर्यंत प्रत्येक २९ जानेवारीला विजय चौकात हा सोहळा होतो. पण आतापर्यंत दोन वेळा तो रद्द करण्यात आला आहे. २००१ साली गुजरातमध्ये भीषण भूकंप झाला. त्यावेळी हा सोहळा रद्द करण्यात आला. तसेच २९ जानेवारी २००९ रोजी देशाचे आठवे राष्ट्रपती वेंकटरामन यांचे निधन झाले होते. त्यावेळीही हा सोहळा रद्द करण्यात आला होता.
भारताच्या इतिहासात या वर्षी पहिल्यांदाच बिटिंग रिट्रिट समारंभात लेजर शोचा समावेश करण्यात आलाय. यासाठी १००० मेड इन इंडिया ड्रोनचा वापर करण्यात आलाय. या बिटिंग रिट्रिट समारंभात १९५० पासून वाजवण्यात येणारी अबाईड विथ मी ही धून यंदा वाजवली जाणार नाहीये.
‘अबाईड विथ मी’ऐवजी कवी प्रदीप यांच्या ‘ये मेरे वतन के लोगो’ची धून वाजवली जाणार आहे.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply