नेहमी प्रमाणे रोजचीच ऑफिस ला जाण्याची ची घाई सुरु होती. सोसायटीच्या बाहेर पडत असतांना रोज दामले काकूंना राम राम ठोकून पुढे निघायचा नियम पण आज दर बंद होता विचार केला कदाचित बाहेर गेल्या असाव्यात म्हणून पुढे निघालो . असे २-३ दिवस गेले काकू दिसल्या नाहीत.
आम्ही आमच्या कामात होतो पण दामले काकूंचा काहीच पत्ता नव्हता त्या एकट्याच राहायच्या वय साधारण ७८ ला आलेला वर्ण गोरा सडपातळ शरीरयष्टी, पण नेहमी बोलून मोकळ्या बिनधास्त स्वभावाच्या पुण्याच्या घरा मध्ये एकट्याच राहायच्या, आम्ही हि कधी विचारला नाही कदाचित त्यांना कोणी मुलबाळ नसाव हा आमचा समज.
पण आमच्या कामावालीने सांगितलं कि त्यांना दोन मुल आहेत आणि ते दोघेही परदेशी असतात त्याचे मिस्टर काही वर्ष पूर्वीच देवाघरी गेलेत म्हणू या एकट्याचा राहतात.
नंतर काही दिवसातच काकूंची तब्बेत बिघडली घरच त्याचं करणारा कुणीच नव्हत .एक दिवस काकू बेड वरून खाली पडल्या तर त्यांना उचलायला सुद्धा कोणीच नव्हत आमच्या पैकीच एका मित्रच लक्ष गेला तेंव्हा त्याने उचलून परत बेड वर झोपवलं , असेच खी दिवस गेले आणि एक दिवशी अचानक बातमी समजली कि काकू देवाघरी गेल्या . डोकं एकदम सुन्न झाल आणि त्यापुढची बातमी ऐकून तर मस्तकातच तिडीक उठली कि काकूंच्या अंत्यविधीसाठी त्याची पोर सुद्धा आली नाही क़हि मोजकी मंडळी जमली त्यांनी सगळे विधी आटोपले.
रात्रभर डोक्यात एकाच विचार कि माणस अशी काही हो वागू शकतात कि आपल्या जन्मदात्यांना शेवटचा अग्नी द्यायला सुद्धा आज कोणाकडे वेळ नाहीये नक्की की होताये. पैश्यामुळे माणूस माणसाला विसर्तोये कदाचित हि गोष्ट नवीन नाही पण हि सत्त्य घटना आहे काहीच दिवसांपूर्वी घडलेली काय वाटला असेल त्या आई ला ज्यांच्यासाठी आयुष्याचा रान केल त्यांनीच आयुष्याच्या संध्याकाळी पाठ फिरवली .
आपण नेमकी कशी प्रगती करतोये यावर हे खूप मोठ प्रश्नचिन्ह आहे ?
आज पैसा आई वडिलांपेक्षा मोठा झालाय का ?
आयुष्याची स्पर्धा करतांना माणसांच्या भावना मेल्या आहेत ?
काय चुकल काकूंचा कि त्यांच्या आयुष्याचा शेवट इतका वाईट व्हावा ?
असे बरेच प्रश्न पडले ,
आज प्रत्त्येकाने यावर खरच विचार करण गरजेच आहे कदाचित आपला शेवट सुद्धा यापेक्षा वाईट असेल.
आता रोज जातांना दिसत ते दामले काकूंच्या घराला लागलेलं कुलुप ज्याची चावी या प्रश्नांच्या उत्तरात आहे .
पण हे बदलायला हव म्हणून त्यासाठी चाललेली जीवाची धडपड सांगायला बर्याच गोष्टी आहेत पण एकच लक्षात ठेवाव आयूष्यात सगळ्या गोष्टी परत मिळतात पण आई आणि बाबा सोडून ….
त्यांना जपा मित्रांनो त्यांना जपा एवढच ….
— श्री.चेतन सुधाकर जोशी उर्फ चेतन
Heart touching…