शेतात दिवस भर राब राब राबतो
जिवाचे रान करतो शरिराचे हाल करतो
तुमचे पोट भरन्या साठी धान्य पिकवतो……
उन असो वा पाउस शेतात काम करीत असतो
२ पैसे कमविन्या साठी ४ पैसे उसने घेतो
घेतलेले कर्ज फेड्न्या साठी प्रयत्न करीत असतो….
अचानक पड्नारा पाउस ,
कधी दडी मारनारा पाउस,
पिकाचे नुकसान करतो
आणि माझे जगने
हराम करतो…
सरकार शेत्कर्यांचे कर्ज माफ़ करेन बोलते
शेतात पिक येन्या साठी मदत करेन म्हणते
विजेचा भार नियम कमी करेन बोलते ….
सरकार मदत करते बी बियाने देते …..ती पण नीट नाहीत
जनावरे देते ती पण धड़ धाकट नाहीत
पान्याला मोटार देते पण विज देत नाही
सरकारने ७५० कोटी मंजूर केले…..कुठे गेले माहित नाही
आधीच कर्जचा डोंगर जिव घेत असतो
शेतात पिक नाही म्हणुन हाताची घडी करून घरी बसतो
मुलाना शाळेत पाठविन्याची ऐपत नाही …
घरची चूल पेट्न्या साठी खिशात पैसे नाही..
धान्य उधर मगिताले तर वाणी बोलतो माफ़ कर बाबा आधीचे फेड
कर्ज मागायला गेलो तर ………………….बैंक बोलते आधीचे फेड
सरकारी मदत मागितली तर ……….परत कशी करणार कर्ज फेड
तुम्हीच सांगा मला
जिव देन्या पलीकडे आहे का काही पर्याय ???
— अंबादास
Leave a Reply