वीर सावरकरांनी १९२६ साली व्यसनमुक्ती वर लिहिलेली कविता
तू सोड सोड भाऊ । दुष्ट दारूला॥
भुरळ घातली या पेयाने कैसी रे तुजला।
तू सोड सोड भाऊ । दुष्ट दारूला॥
पैसे देऊनी विषास पीशी। हे न कळे तुजला।
तू सोड सोड भाऊ । दुष्ट दारूला॥
मिळे कुठे जी कवडी दमडी। देशी बाटलीला।
तू सोड सोड भाऊ । दुष्ट दारूला॥
देशिल तरी मग भुकेस कुठला। घास मुलाबाळा।
तू सोड सोड भाऊ । दुष्ट दारूला॥
शुद्धी जातसे मारीसी घरच्या। दीन बायकोला।
तू सोड सोड भाऊ । दुष्ट दारूला॥
क्षणिक सुखास्तव मिळविसी मातीस। सगळ्या जन्माला।
तू सोड सोड भाऊ । दुष्ट दारूला॥
— स्वातंत्र्यवीर सावरकर,
1926 – रत्नागिरी
Leave a Reply