आभाळीच्या देवराया
कां ? पेरितोस रे माया
अवचित येसी, घेवूनी जासी
कां ? रुजवितोस रे माया
कां ? निर्मिलास रे निसर्ग
उध्वस्त क्षणात सारे व्हाया
निष्ठुर करिसी तू पंचभूते
कुठेच न उरे आसरा जगाया.
कां ? जाळलिस रे लंका
कां? बुडविलिस द्वारका
तूच रे निर्माता अन त्राता
तूच आभाळीचा देवराया
चैतन्य तुझेच रे हे सारे
घाल रे तुझीच पाखरमाया
निर्बुद्ध जरी मी हा पामर
शरणागत येईन तुझिया पाया
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. १०६.
९ – ४ – २०२२
Leave a Reply