नवीन लेखन...

आदत आणि मदत

एका गावांतील श्रीमंत गृहस्थांकडे एका तरुणाने येऊन आर्थिक मदतीची याचना केली. परंतु त्या श्रीमंत गृहस्थाने त्याला गोड शब्दात नकार दिला. नंतर काही दिवसांनी त्याच तरुणाने त्या श्रीमंत गृहस्थाकडे येऊन नवीन उद्योगासाठी आर्थिक मदत करण्याची विनंती केली. ही विनंती त्या श्रीमंत गृहस्थाने तात्काळ मान्य केली आणि तशी मदतही दिली.

तरुणाने त्याला आश्चर्याने विचारले, ‘या आधी मी मामुली रकमेची मागणी केली ती तुम्ही नाकारलीत पण आता मात्र त्याहून ‘कितीतरी अधिक रक्कम दिली असे का?’

तेव्हा त्या श्रीमंत गृहस्थाने सांगितले या आधी तू जे पैसे मागितले होतेस, ते तुला देऊन तुझी समस्या दूर होणार नव्हती. ते पैसे खर्च झाल्यावर तू आणखी कोणाकडे तरी हात पसरले असतेस. पण आता तू स्वत:चा व्यवसाय करतो आहेस. अशा वेळी तुला मदत केली तर तुझ्यावर इतरांकडे हात पसरण्याची वेळ कधीच येणार नाही.

मदत करताना नेहमी हा विचार करावा की, आपल्या मदतीचा समोरच्याला खरोखरच आधार होणार आहे, का त्यामुळे तो आणखी अपंग होणार आहे? दान सत्पात्री असावे असे म्हणतात, ते याच अर्थामुळे. आर्थिक किंवा वस्तुरूपाने केलेल्या मदतीमुळे त्या माणसाचे तत्कालीन प्रश्न, समस्या झटपट दूर होतात. पण त्या समस्येचं कारण तसेच राहिल्याने, नवीन समस्या निर्माण होऊ शकते. लातूर किंवा कच्छमधील भूकंपाच्या वेळी ही गोष्ट सिद्ध झाली आहे. भूकंपग्रस्तांना पैसे, कपडे वाटून किंवा नवीन घरे देऊन त्यांची समस्या संपली नाही भावनिक आधार देऊन, त्यांचे मनोधैर्य पुन्हा उंचावणे आणि मदत कार्यात त्यांनाही सहभागी करून घेणे, या मार्गांनीच त्यांचे आयुष्य काही प्रमाणात पूर्ववत करता आले.

एखाद्याला तुम्ही मदत केलीत वा दान दिलेत म्हणून त्याच्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ ठरत नाही. तुमच्याजवळ जे अधिक आहे, मग ते पैसा, ज्ञान, वेळ, कला, श्रम- काहीही असो, त्याचा लाभ इतरांनाही व्हावा या भावनेतून मदत करायला शिका. मदत करणे म्हणजे कर्ज देणे नव्हें, त्यामुळे मदत करताना परतफेडीची अपेक्षा मनात ठेऊच नका. लोकांनी आपली निगा राखावी, आपल्याला पाणी घालावे म्हणून एकही झाड सावली देत नाही. सावली देणे हा जसा झाडाचा सहजधर्म आहे तितक्याच सहजपणे दुसर्‍याला मदत करायला शिका. मात्र या सहजपणातही जागरुकता हवीच. आपल्या मित्राला मदत म्हणून एखादा हुशार विद्यार्थी परीक्षेत त्याला उत्तरे सांगू लागला तर ते योग्य ठरणार नाही. मित्राला खरोखरच मदत करायची असेल तर त्याने परीक्षेपूर्वी मित्राला विषय शिकवून त्याची चांगली तयारी करून घ्यावी.

मदत कोणाला करावी याबरोबरच कशासाठी करावी यालाही महत्त्व आहेच. तुमचे कार्य, उद्देश, सकारात्मक असेल, विधायक असेल, समाजहिताचा असेल तर त्याला मदत करणारे अनेक हात समाजातून पुढे येतात. स्वातंत्र्यपूर्व काळातील आझादहिद सेनेपासून ते आजच्या काळातील कारगील युद्धापर्यंत, देशांच्या सैनिकांना, समाजाच्या विविध स्तरांतून वेगवेगळ्या प्रकारची मदत कशी मिळाली, हे सर्वांनाच ठाऊक आहे. अशी अनेक उदाहरणे वेगवेगळ्या क्षेत्रात आढळतील, कारण एकमेकांविषयी सहानुभूती बाळगून एकमेकांना मदत करणे, हाच खरा मानवाचा धर्म आहे. एखादी मुंगी जर तुम्ही उचललीत तर कडकडून चावते कारण तो तिचा धर्म आहे. मुंगीसारखा सुक्ष्म जीव आपला धर्म सोडत नाही. मग माणसासारखा श्रेष्ठ जीव आपला आपला मदतीचा धर्म कसा बरे सोडेल?

चिंतामणी कारखानीस.

चिंतामणी कारखानीस
About चिंतामणी कारखानीस 75 Articles
चिंतामणी कारखानीस हे ग्राहक संरक्षण सेवा समिती या संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष होते. त्यांना या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल २०१० चा Consumer Awareness Award हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे ते माजी अध्यक्ष आहेत. विविध वृत्तपत्रांत व मासिकांत त्यांचे लेख प्रकाशित झाले असून आकाशवाणीवर भाषणेही प्रसारित झाली आहेत. ते शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रवक्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..